पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या मुला-नातवंडांकडे पाहिले की लगेच पटते. खूप पाहुणेरावणे असलेल्या घरात राहताना राग यावा असेही प्रसंग अधूनमधून घडतच असतात. अशावेळी शशिकलाताई पूर्ण मौनात जातात. पण आवाज चढवून त्या कधीच बोलणार नाहीत किंवा कोणाला रागवून काही सुनावणारही नाहीत. "तू त्या व्यक्तीला काही बोलत का नाहीस?" असे जेव्हा रावसाहेब विचारायचे, तेव्हा त्यांचे उत्तर असायचे, "जाऊ द्या. बोलण्यापेक्षा न बोलताच माणसं शहाणी होतात.' }} गृहिणीपदाचा मनोभावे केलेला स्वीकार हे शशिकलाताईंच्या एकूण प्रगल्भतेचेच एक लक्षण आहे. एक हृद्य आठवण रावसाहेब सांगतात. एकदा अपरात्री वीस- एक कार्यकर्ते अनाहूतपणे त्यांच्या घरी येतात व जेवणाची मागणी करतात. रावसाहेब संतापतात. पण शशिकलाताई स्वतः सगळ्यांना पिठले-भाकरी करून वाढतात. अनाहूत पाहुण्यांचा आहार जबर. पण शशिकलाताई हात आखडता घेत नाहीत. भरपूर राबतात. नंतर त्यांची झोपण्याचीही व्यवस्था करतात. सकाळी उठून बघावे तो काय, चादरी-सतरंज्यांसह पाहुणे गायब ! रावसाहेब खूप चिडतात. पण त्यांना शांत करत शशिकलाताई म्हणतात : "जाऊ द्या, झालं ते झालं. आपण दुसन्या सतरंज्या चादरी घेऊ शकत नाही का ?" माणसामध्ये भले-बुरे दोन्ही असणार हे स्वीकारणारी आणि ते स्वीकारून पुढे जाणारी ही मानसिकता हादेखील प्रगल्भतेचाच एक आविष्कार आहे. ? एवढ्या प्रदीर्घ संसारप्रवासात खाचखळगे असंख्य आले असणार, आडवळणे- चकवे आले असणार, शरदाच्या चांदण्याप्रमाणे वैशाखवणवेही आले असणार. पण हे सर्व अनुभव आपल्या कवेत घेऊन शशिकलाताई सतत आनंदभाविनीच राहिल्या आहेत. शशिकलाताईंच्या व्यक्तित्वाविषयी विचार करताना व संबंधितांशी चर्चा करताना शशिकलाताईंची अनेक वैशिष्ट्ये समोर येतात. (खरे तर त्यांच्यामुळे इतरांमध्येही संक्रमित होत आता ती एकूण शिंदे कुटुंबाचीच वैशिष्ट्ये ब आहेत.) यांतील काही मुख्यतः भारतीय परंपरेशी निगडित आहेत, तर काही मुख्यत: आधुनिक मूल्यांशी किंवा नवतेशी निगडित आहेत. परंपरेशी निगडित वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना सर्वप्रथम पुढे येते ते कुटुंबप्रेम. मोठ्यांचा आदर करणे, वडिलधाऱ्यांच्या पाया पडणे, लहानमोठ्या सर्वांना अहो- जाही करणे, बाहेर जाताना घरच्या सगळ्यांना सांगून जाणे हे या घरात अगदी सहजत: होते. नवीन कपडे घातले की नातवंडे नेहमी आपल्या पाया पडतात, अजुनी चालतोची वाट... ३०८