पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्टाफचे चांगले सहकार्य मिळत असल्यामुळे कॉलेजचा शैक्षणिक व व्यवस्थापकीय दर्जाही सातत्याने उच्च राहिला आहे. 66 श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे रावसाहेब अनेक वर्षे अध्यक्ष होते. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्यामार्फत प्रयत्न करून त्यांनी सोसायटीला दोन-अडीच एकर मोक्याची जमीनही मिळवून दिली. या बाबतीत मंत्रिमहोदयांनी दाखवलेल्या तत्परतेचाही इथे उल्लेख करायला हवा. संस्थेसाठी जमीन मागणारा प्रस्ताव घेऊन जेव्हा रावसाहेब त्यांना भेटायला मुंबईच्या मंत्रालयात गेले, तेव्हा बसल्या जागीच मंत्रिमहोदयांनी तो मान्य केला. एवढेच नव्हे तर, आजचा दिवस मुंबईतच थांबा,” असे सांगून दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याबाबतचा शासकीय आदेशच रावसाहेबांच्या हाती दिला. तो आदेश घेऊनच रावसाहेब श्रीरामपूरला परतले. शासकीय कामे अशी तडकाफडकी होणे हे तसे देवदुर्लभच ! लौकरच सोसायटीची इमारत उभी राहिली व सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. अनेक वर्षे अविरत प्रयत्न करून रावसाहेबांनी ती संस्था नावारूपाला आणली; पण त्यांचा नैतिकतेचा आग्रह इतर काही सहकाऱ्यांना खूप जाचक व नकोसा झाला आहे हे पाहिल्यावर मात्र त्यांनी संस्थेचा निरोप घेतला. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार - विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले. दुर्दैवाने कुसुमाग्रजांच्या निधनानंतर लौकरच प्रतिष्ठानात काही वाद उफाळून आले, वर्तमानपत्रांतून त्यावर बरीच अनिष्ट अशी पत्रापत्री झाली. त्यामुळे मग रावसाहेब प्रतिष्ठानाच्या कामापासून दूर झाले. रावसाहेबांचे हेही एक वैशिष्ट्य आहे. जे काम त्यांना महत्त्वाचे वाटते त्या कामात ते स्वतःला झोकून देऊन सहभागी होतात, पण त्याच वेळी त्यांना संस्थेतील कुठल्याही पदाचा मोह नसतो; 'इदं न मम' या निर्लेप वृत्तीने ते त्या कामापासून दूरही होऊ शकतात. स्वतःच्या नावाने एखादी संस्था उभी करणे रावसाहेबांच्या एकूण प्रकृतीला कधीच मानवले नाही. परंतु वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांच्या काही जिवलग मित्रांनी अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान या नावाने एक प्रतिष्ठान सुरू केले. स्वतः रावसाहेबांनी त्याला खूप विरोध केला. 'रयत शिक्षण संस्थेच्या इतक्या शाळा असताना आपण कशाला वेगळे प्रतिष्ठान व शाळा काढायची?" असेच रावसाहेबांचे म्हणणे होते. पण मग भाऊसाहेब थोरात व सुमनभाई शहा यांच्यासारख्या जिवलग मित्रांच्या आग्रहापुढे त्यांना मान तुकवावी लागली. माजी प्राचार्य टी. ई. शेळके व इतर मंडळी प्रतिष्ठानाच्या शैक्षणिक कामात मदत करतात. प्रतिष्ठानाबद्दल काही बोलावयाचे म्हटले, की स्वतः रावसाहेबांना अतिशय संकोचल्यासारखे होते. त्यांचे चिरंजीव डॉ. राजीव व स्नुषा डॉ. प्रेरणा या मात्र प्रतिष्ठानाला सर्वतोपरी साहाय्य करीत असतात व प्रतिष्ठानाच्या शाळेसाठी त्यांनी आपली माझ्याचसाठी फुललो नसे मी २९७