पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही मित्र यांनी जमावाला व लुटारू पुढाऱ्यांना थोपविण्याचा प्रयत्न करून पाहिला. ते श्रीरामपूरचे नगराध्यक्ष व रावसाहेबांची बहीण चहाबाई हिचे पुत्र. पण त्यांनी वातावरण निवळावे म्हणून केलेल्या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. इकडे रावसाहेब बेचैन होऊन सारखे वरिष्ठ पोलीस यंत्रणेला फोन करीत होते. वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. 'पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा' अशी सूचना उलट त्यांनी रावसाहेबांना दिली. सगळ्या प्रकारामध्ये रात्र उलटून सकाळ होऊन गेली होती. मधुकर देशमुख यांचा रावसाहेबांना सकाळी पुन्हा फोन आला. "ते पुढारी आता या जमावाला शीख समाजाच्या वसाहतीकडे नेण्याचं ठरवत आहेत. शिखांची घरं लुटण्याचा त्यांचा विचार आहे. तसं झाल्यास परिस्थिती भयानक होईल." काही शीख मित्रांचेही फोन आले. 'दुकाने तर लुटली पण घरे, बायका- मुले तरी सुरक्षित राहावीत' ही त्यांची भावना होती. सगळ्यांत धक्कादायक बाब म्हणजे अहमदनगरच्या लष्करी छावणीतून काही शीख लष्करी अधिकाऱ्यांचे फोन आले. 'रणगाडे घेऊन आम्ही तुमच्या संरक्षणाला येऊ का ?" असे त्यांचे निरोप होते. रावसाहेब त्वरित पोलीस स्टेशनला गेले. ते तेथे आल्याचे समजल्यावर कलेक्टरही तेथे आले. जिल्हा पोलीस अधिकारी मात्र विश्रामगृहात असल्याचे समजले. धक्कादायक बाब अशी, की पोलीस यंत्रणा कलेक्टरसाहेबांना 'सर्व ठीक आहे' म्हणून वेळोवेळी रिपोर्ट देत होती. कलेक्टरांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलावून घेतले. जिल्हा पोलीस प्रमुख आपल्याच तोऱ्यात उद्धटपणे बोलत होते. ते पाहून रावसाहेब संतापाच्या भरात त्यांना खूप बोलले. तेवढ्यात वायरलेसवर जमाव शिखांचा पेट्रोलपंप लुटत असल्याचे, तसेच जमाव शिखांच्या वसाहतीकडे निघत असल्याचे रिपोर्ट्स कलेक्टरसाहेबांना मिळाले. कलेक्टरांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना गप्प बसवले. रावसाहेबांना प्रत्युत्तर न करण्याचे सुचवले. त्याच वेळी जिल्हा होमगार्ड कमांडर श्री. बन्सीलाल कोठारी तिथे येऊन दाखल झाले. त्यांनीही रावसाहेबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. कलेक्टरांनी रावसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तत्काळ कर्फ्यूचा आदेश काढला. लगेचच पोलीस- होमगार्ड शहरात कर्फ्यू सुरू झाल्याची भोंग्यावर माहिती देत वाहनांतून फिरू लागले. त्वरित पांगापांग होऊन सर्व जण घरोघर पळून गेले. शहर एकदम शांत झाले. शीख बांधवांनी सुटकेचा निःश्वास सोडला. श्रीरामपुरातील एक कपड्याचे व्यापारी व तेथील शीख समाजाचे एक नेते जगजितसिंग चुग यांच्याशी बोलायची संधी प्रस्तुत लेखकाला नोव्हेंबर २०१३मध्ये मिळाली. उपरोक्त प्रसंगाची विस्तृत माहिती त्यांनी दिली व कृतज्ञतापूर्वक 'हमे अजुनी चालतोची वाट... २८८