पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"जर्मन सिस्टरांनी श्रीरामपूरला पाऊल टाकल्यापासून रावसाहेबांचे व त्यांचे ऋणानुबंध जुळले आणि दिवसेंदिवस ते वृद्धिंगत होत गेले आहेत. रावसाहेब हे त्यांना पाठच्या भावासारखे वाटतात. अलीकडे जर्मन दवाखान्याला पन्नास वर्षे झाली. रावसाहेब शिंदे यांनी श्रीरामपुरातील जाणत्या लोकांना हाताशी धरून, सिस्टरांच्या संस्थेचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम आखला आणि तो धूमधडाक्यात पाडला. स्थानिक आमदार आणि नगराध्यक्ष यावेळी हजर होते. हा कार्यक्रम म्हणजे भारतीय सहिष्णुतेची जाहीर पावती होती. परिसरातील सुशिक्षित हिंदूंनी एकत्र येऊन एका मिशनरी संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा हा कदाचित भारतातील पहिलावहिला आणि एकमेव कार्यक्रम असावा. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय सुसंवाद ही काळाची गरज आहे. महासत्ता होण्याची स्वप्ने आपला देश रंगवत आहे. त्यासाठी देशात सुसंवादाचे वातावरण जोपासले गेले पाहिजे. रावसाहेब शिंदेसारख्या व्यक्ती ते कार्य करीत आहेत, ही त्यांची फार मोठी समाजसेवा आहे. रावसाहेबांचा परिचय झाल्यामुळे माझी सांस्कृतिक श्रीमंती वाढली आहे, असेच मला वाटते. " ख्रिश्चनधर्मीयांप्रमाणेच शीख धर्मीयांबरोबर असलेले रावसाहेबांचे नातेही असेच जवळिकीचे होते. १९४७ साली फाळणीनंतर निर्वासितांचा मोठाच लोंढा भारतात आला. त्यात शीख, पंजाबी व सिंधी प्रामुख्याने होते. वास्तव्यासाठी योग्य अशी भूमी शोधत त्यांच्यापैकी काही जण श्रीरामपूरला येऊन पोहोचले. यांत बरेच शीख होते. अंगभूत व्यापारी कौशल्य, मिळून मिसळून गोडव्याने वागायची वृत्ती आणि कष्ट करण्याची तयारी यांच्या जोरावर श्रीरामपूरच्या बाजारपेठेत त्यांनी बराच जम बसवला. त्यांच्या मालकीची अनेक मोठमोठी दुकाने भरभराटीला आली. त्यांनी आपले एक गुरुद्वाराही उभारले. गुण्यागोविंदाने नांदत भोवतालच्या समाजाशी हे शीख बांधव समरस झाले. पण पुढे पंजाबात खलिस्तानचे वारे वाहू लागले. त्यातच १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली व ती त्यांचा अंगरक्षक असलेल्या एका शीख व्यक्तीनेच केली होती. त्यामुळे देशभर शिखांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली. श्रीरामपुरातही शिखांच्या विरुद्ध वातावरण पेटले होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. तथाकथित पुढाऱ्यांनी आणि समाजकंटकांनी या परिस्थितीचा नेमका फायदा घेतला. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दंगल करण्यात आली. शिखांच्या दुकानांची नासधूस करण्यावर जमावाचा रोख होता. रात्रीची वेळ होती. लुटालुटीची बातमी रावसाहेबांच्या कानावर आली. त्यांचा भाचा मधुकर देशमुख व त्याचे माझ्याचसाठी फुललो नसे मी २८७