पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यागापुढे आणि सेवेपुढे मी फी न घेणे अगदीच क्षुल्लक आहे. काहीही न घेण्यात मला अधिक समाधान आहे." असे रावसाहेब म्हणाले. फीची रक्कम लहानसहान नव्हती; रावसाहेबांच्या आठवणीप्रमाणे सुमारे तीस-पस्तीस हजार रुपयांच्यापेक्षा ती रक्कम जास्त असावी. सेवाभावी संस्था आणि शिक्षण संस्था यांच्या कायदेशीर कामाची फी ते कधीच घेत नसत. सिस्टरना अवघड वाटले ते असे, की त्यांच्या फीसाठीची रक्कम सरकारकडून त्यांना वसूल होऊन मिळाली होती! अशा अनेक घटनांमुळे या जर्मन व स्पॅनिश सिस्टर्समध्ये रावसाहेबांच्याबद्दल कायम कृतज्ञतेची भावना होती. पुढे रावसाहेब व शशिकलाबाई दोन महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर असताना या सिस्टर्सनी त्यांचे ज्या प्रेमाने आदरातिथ्य केले त्यामागेही कुठेतरी ही कृतज्ञतेची भावना असावी. रावसाहेबांच्या एक पक्षकार डॉ. मेरी अब्राहम ऊर्फ वडाळकरबाई यांच्याविषयी पूर्वी लिहिलेलेच आहे. स्वतंत्र डॉक्टर म्हणून त्यांनी श्रीरामपुरात व्यवसाय केला असला, तरी मूलत: त्याही एक मिशनरीच होत्या. एकूणच ख्रिश्चन मिशनऱ्यांविषयी रावसाहेबांचे अनुभवाधिष्ठित मत खूप चांगले आहे व म्हणूनच त्यांच्याविरुद्ध वरचेवर केली जाणारी ओरड त्यांना पूर्वग्रहदूषित व गैर वाटते. ते म्हणतात : " तथाकथित धर्माभिमान्यांनी ह्या जर्मन हॉस्पिटलला सुरुवातीपासूनच विरोध करायला सुरुवात केली होती. 'परकीय मिशनऱ्यांचे येथे काय काम? यांचा हा धर्मांतराचा डाव असला पाहिजे, हॉस्पिटल हे वरवरचे नाटक आहे,' असा त्यांचा सूर होता. स्वत: तर गरिबांच्या, दलितांच्या वाऱ्यालाही उभे राहायचे नाही, आजारात ते जगतात की मरतात याचीही दखल घ्यायची नाही आणि दुसरे कोणी सेवाभावी वृत्तीने पुढे आले, तर काही ना काही सबबी पुढे करून त्यांना विरोध मात्र करायचा, अशी प्रतिगामी वृत्ती धारण करणाऱ्य रीतच असायची. याबाबत मी सातत्याने ह्या हॉस्पिटलच्या बाजूने उभा राहिलो. " याच भूमिकेतून त्यांनी ५ सप्टेंबर १९८६ रोजी श्रीरामपुरात मदर टेरेसा यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्यांना मानपत्र दिले होते. सत्कार - समितीचे रावसाहेब अध्यक्ष होते. अथांग जनसागर या कार्यक्रमाला लोटला होता व त्यात स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यावेळी मदर टेरेसांनी रावसाहेबांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला होता. आजही रावसाहेबांना तो आयुष्यातला एक अलभ्य लाभ वाटतो. वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चनांचे एक धर्मगुरू आहेत व शिवाय ते एक चांगले लेखकही आहेत. त्यांनी लिहिले आहे : अजुनी चालतोची वाट... २८६