पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इथे काम केले. जर्मन हॉस्पिटल खरे तर गोरगरिबांसाठी म्हणून या मिशनऱ्यांनी सुरू केलेले. पण तेथील सेवेचा दर्जा इतका उत्कृष्ट होता, की केवळ श्रीरामपुरातीलच नव्हे तर इतर लांबलांबच्या जिल्ह्यांमधील आर्थिक सुस्थिती असलेले अनेक रुग्णही या हॉस्पिटलचा वापर करू लागले. त्यांतले काही तर खूप श्रीमंतही होते. त्यांनाही हॉस्पिटल आपल्या नेहमीच्या अत्यल्प दरातच सर्व सेवा देत होते व तेही त्याच दरात ती सेवा घेत होते; पण हॉस्पिटलसाठी काही आर्थिक मदत करण्यासाठी मात्र ही मंडळी कधीही पुढे येत नसत. हॉस्पिटलला मदत मिळायची ती मुख्यतः युरोपमधूनच. रावसाहेबांना याविषयी नेहमीच खूप खंत वाटत आली आहे. १९८९मध्ये जर्मन मिशनने स्पॅनिश मिशनकडे हे हॉस्पिटल सुपूर्त केले. त्यावेळी रावसाहेबांनी स्वत:हून जर्मन सिस्टर्ससाठी एक सार्वजनिक निरोप समारंभ आयोजित केला होता. खरे तर हे मिशनरी खूप प्रसिद्धिपराङ्मुख असतात; स्वत:वर प्रकाशझोत पडू देणे त्यांच्या कार्यपद्धतीत बसतही नाही. साहजिकच त्यांचा अशा समारंभाला ठाम नकार होता, पण शेवटी रावसाहेबांच्या आग्रहापुढे त्यांना मान तुकवावी लागली. जनतेने समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्यातील केइएम रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. बानू कोयाजी उपस्थित होत्या. अतिशय हृद्य असा हा निरोप समारंभ झाला. हॉस्पिटलचा २००३ मध्ये सुवर्णमहोत्सव साजरा झाला त्यावेळीही रावसाहेबांनी पुढाकार घेतला. त्या कार्यक्रमात श्रीरामपूरवासीयांच्या वतीने व्यासपीठावर एकटे रावसाहेबच होते. क्टरांच कधीकधी या हॉस्पिटलला अगदी अकल्पित अशा संकटांना तोंड द्यावे लागले. एकदा एका पुढाऱ्यांच्या अपघातप्रसंगी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. रात्री बारा - एकच्या सुमारास. रात्रपाळीच्या मुख्य सिस्टर्स वरच्या मजल्यावर एका सिरिअस पेशंटवर सूचनेनुसार उपचार करीत होत्या. मुख्य डॉक्टर इतक्या रात्रीपर्यंत जेवणही घेऊ शकले नव्हते; त्यावेळी ते घरी जेवण घेत होते. तशाही परिस्थितीत हॉस्पिटलच्या स्टाफपैकी संबंधित सिस्टर्स त्या पेशंटला पाहण्यासाठी इमारतीबाहेर आल्या. कंपाउंडमध्ये लावलेल्या त्या पुढाऱ्यांच्या गाडीत त्या शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले, की पेशंटचे आधीच प्राणोत्क्रमण झालेले होते. त्यांच्याबरोबर आलेल्यांनी मात्र आरडाओरडा करून गदारोळ केला. "पेशंटला दवाखान्यात दाखल करून घेतले नाही, जागा नाही असे संगितले,” असा खोटानाटा डांगोरा पिटत गाडीतून त्या पेशंटला तसेच घेऊन ते निघूनही गेले. ह्या घटनेचा गैरफायदा उठविण्याच्या हेतूने हॉस्पिटलविषयी व्यावसायिक असूया बाळगणाच्या काही डॉक्टरांनी काही जणांना पुढे करून अजुनी चालतोची वाट... २८४