पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशातच ती आपत्कालीन शस्त्रक्रिया केली गेली आणि ती यशस्वीही ठरली. ख्रिश्चन चर्चच्या एकूण संघटनात्मक आखणीनुसार वेगवेगळी मिशन्स वेगवेगळ्या सेवाक्षेत्रांत विशेषत्वाने कार्यरत असतात. कोणी प्राथमिक शिक्षणाचे काम करेल तर कोणी उच्च शिक्षणाचे, कोणी अनाथालये चालवेल तर कोणी वृद्धाश्रम, कोणी आरोग्यक्षेत्रात असेल तर कोणी व्यसनमुक्तीच्या श्रीरामपुरातील सेंट ल्यूक्स चालवणाऱ्या जर्मन मिशनचा भर रुग्णसेवेवर होता व हे काम त्या मिशनतर्फे आजही ३४ देशांमध्ये सुरू आहे. सुरुवातीला इथे मिशनने जर्मनीहून दोन डॉक्टर्स व सहा सिस्टर्स यांची नियुक्ती केली. पुढे त्यांची संख्या वाढली. काही जुनी मंडळी परत गेली, काही नवीन आली. हॉस्पिटलच्या चीफ अॅडमिनिस्ट्रेटर सिस्टर क्रिस्तिना ओट (Ott) ह्या मात्र सलग ४० वर्षे इथे कार्यरत राहिल्या तर त्यांच्या मदतनीस सिस्टर अॅनी यांनी ३० वर्षे काम केले. डॉ. अनिल मासूरकर हॉस्पिटलचे पहिले भारतीय मेडिकल डायरेक्टर. त्यांचे वडील त्यावेळी बेलापूर शुगर फॅक्टरीत मेडिकल ऑफिसर होते. अत्यंत माफक पगारावर, खरे तर मानधनावरच म्हणायला हवे, डॉ. मासूरकर यांनी ३६ वर्षे सेंट लूक्सचे वैद्यकीय संचालक म्हणून काम पाहिले. आज या रुग्णालयात दहा पूर्णवेळ डॉक्टर्स, चार अर्धवेळ डॉक्टर्स, सहा ते आठ मेडिकल इन्टर्न्स, एकोणीस नर्सेस, पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थी नर्सेस व सुमारे शंभर इतर कायमस्वरूपी सेवक कार्यरत आहेत. पंचवीस खाटांपासून सुरू झालेल्या या रुग्णालयात आज दोनशे वीस खाटा (बेड्स) आहेत. वर्षाकाठी सुमारे चार हजार शस्त्रक्रिया केल्या जातात व त्यांपैकी आठशे ते हजार या मोठ्या शस्त्रक्रिया असतात. दरवर्षी हजार एक बाळंतपणे होतात. त्याशिवाय रोज सुमारे पाच-सहाशे बाह्यरुग्णांवर (OPD) औषधोपचार केले जातात. इथली स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि रुग्णसेवेचा एकूण दर्जा हा कोणीही अचंबित व्हावे असा आहे. ही सर्व रुग्णसेवा अगदी नाममात्र पैसे दिली जाते आणि विशेष म्हणजे ज्यांची एक पैसाही द्यायची ऐपत नाही, अशाही रुग्णांना उपचाराविना परत पाठवले जात नाही. , या रुग्णालयाचे आर्थिक धोरण अगदी वेगळेच आहे. स्वयंसेवी संस्था चालवत असलेल्या रुग्णालयांनीही (खरे तर त्यांच्या सर्वच उपक्रमांनी) शक्य तितक्या लौकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे, सतत दानावर अवलंबून राहू नये अशी हल्ली सार्वत्रिक अपेक्षा दिसते. खुद्द सरकारलाही आपले विविध उपक्रम स्वयंपूर्ण व्हावेत असे वाटत असते. नुसत्याच आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे धोरण खूप जणांना योग्यही वाटते. या रुग्णालयाची भूमिका मात्र रुग्ण किती पैसे देतात याचा विचार न करता सर्वांनाच उत्तमात उत्तम सेवा द्यायची, त्यात कसर करायची अजुनी चालतोची वाट... २८२