पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोसायटीचे अध्यक्षपद भूषवत असताना ते आव्हान यशस्वीरीत्या पेलूनही दाखवले. एखादी सहकारी संस्था उत्तम प्रकारे कशी चालवता येते याचा एक आदर्शच या निमित्ताने त्यांनी प्रस्थापित केला. त्यांच्या एकूण कार्यकाळातील हा एक अभिमानास्पद असा कालखंड मानता येईल. वकिलीतून आलेल्या आर्थिक स्थैर्यामुळे हळूहळू सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून इतरही अनेक गोष्टींसाठी रावसाहेब वेळ काढू लागले. त्यातलाच एक भाग म्हणजे श्रीरामपूरच्या सेंट ल्यूक्स (St. Luke's; स्थानिक भाषेत संतलूक किंवा नुसते जर्मन हॉस्पिटल) हॉस्पिटलबरोबर त्यांनी जोडलेले प्रदीर्घ काळचे नाते. जर्मनीतील वूर्सबर्ग या गावातील 'सिस्टर्स ऑफ मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूट' या मिशनरी संस्थेने हे हॉस्पिटल २२ नोव्हेंबर १९५३ रोजी स्थापन केले. त्याची पार्श्वभूमी मोठी रोचक आहे. अहमदनगर जिल्हा हा पूर्वीपासून दुष्काळी व म्हणून गरीब. 'गरिबातल्या गरीब माणसांसाठी सेवा करणे' हे ख्रिश्चन धर्मातील जेझुइट मिशनऱ्यांचे उद्दिष्ट. अशा गरिबांच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या फादर श्वाइगर्ट (Schweigert) या एका तरुण मिशन याचा श्रीरामपूरजवळ मृत्यू झाला. तसा त्याचा आजार अगदी किरकोळ होता व जुजबी औषधोपचारांनीही तो सहज बरा झाला असता. पण तशी अगदी प्राथमिक वैद्यकसेवाही तेव्हा त्या परिसरात उपलब्ध नव्हती. तिथून सर्वांत जवळचे हॉस्पिटल सत्तर किलोमीटरवरील अहमदनगर शहरात होते; तेही काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनीच चालवले होते. फादर श्वाइगर्टना तितक्या लांब घेऊन जाणे त्यावेळी शक्य झाले नव्हते. त्यातच त्यांचा देहान्त झाला. इतर जेझुइट सहकाऱ्यांना याचा खूपच धक्का बसला व असे औषधोपचाराविना दुर्दैवी निधन भविष्यात कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून या मिशनऱ्यांनी श्रीरामपूर येथे हे पंचवीस खाटांचे रुग्णालय उभारले. हे मिशनरी उपरोक्त जर्मन मिशनशी संलग्न असल्याने 'जर्मन हॉस्पिटल' म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पुढे १९८९पासून स्पेनमधल्या झारागोझा गावातील 'सिस्टर्स ऑफ चॅरिटी ऑफ सेंट अॅन' या संस्थेने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आहे, तरीही 'जर्मन हॉस्पिटल' म्हणूनच आजही या हॉस्पिटलचा उल्लेख होतो. कसोटीचे क्षण या हॉस्पिटलच्या आयुष्यात सतत येत राहिले. अगदी हॉस्पिटल स्थापन झाले त्याच दिवशी एका रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेची वेळ होईस्तोवर काळोख पडला होता. हॉस्पिटलमध्ये त्यावेळी विजेचे कनेक्शन नव्हते. केरोसीनवर चालणारा एक पेट्रोमॅक्सचा दिवा आणि एक बॅटरी टॉर्च तेवढा उपलब्ध होता. पण त्या अंधूक माझ्याचसाठी फुललो नसे मी २८१ ...