पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योजनांचा फायदा कसा घ्यावा, इतरत्र याबाबत कुठलेकुठले नवे प्रयोग चालू आहेत, त्यांपासून आपण काय शिकू शकू वगैरे विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली गेली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सोसायटीचे रोजचे दूधसंकलन बघताबघता तीन हजार लिटरवर पोचले. श्रीरामपुरातील सोसायटीची अत्याधुनिक, पाच लाखांची इमारत सरकारकडून कुठलेही अनुदान किंवा बँकेकडून एक रुपयाचेही कर्ज न घेता केवळ स्वतःच्या गंगाजळीतून उभी राहिली. अत्यंत प्रामाणिक आणि मूल्याधिष्ठित व्यवस्थापन हा या कामातला चौथा महत्त्वाचा मुद्दा भ्रष्टाचाराला फारसा वाव राहू नये म्हणून रोखीने व्यवहार करायचे प्रमाण इथे अगदी अत्यल्प ठेवले गेले. सभासदांचे पैसे थेट त्यांच्या बँकखात्यावर जमा होत. सोसायटीला दरसाल होणारा फायदा बोनसच्या स्वरूपात सभासदांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जाई. स्वत:जवळ रोख रक्कम बाळगण्याचा अधिकार कुठल्याही पदाधिकाऱ्याला नव्हता. संचालकांना चहापाणी, बैठकभत्ता वगैरे काहीही दिले जात नसे. दिखाऊ स्वरूपाचे कुठलेही कार्यक्रम सोसायटी करत नसे. राजकीय वा इतर कुठल्याही सत्तास्पर्धेत स्वतःचे घोडे पुढे दामटण्यासाठी सोसायटींचा वापर होत नसे. आपल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत सोसायटीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी रावसाहेबांनी कुठल्याही राजकीय पुढान्याला कधी आमंत्रित केले नाही; सोसायटीच्या वास्तूत कुठल्याही व्यक्तीच्या नावाने शिलान्यास झाला नाही किंवा स्मरणशिल्प उभारण्यात आले नाही. सोसायटीचा कारभार अत्यंत चोख चालतो यावर सभासदांचा विश्वास होता. त्यामुळे सोसायटीचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून येई. सभासद एकोप्याने विचारविनिमय करून संचालक निवडत. खर्चिक आणि फाटाफूट करणारे निवडणुकांचे राजकारण इथे नव्हते. पण तरीही एकदा सोसायटीच्या कसोटीचा क्षण आलाच. तो प्रसंगही मुद्दाम सांगण्यासारखा आहे. संचालक कोणी व्हायचे हे सल्लामसलतीने आधीच ठरले होते, पण तरीही एका फुटीर गटाने आयत्या वेळी स्वत:चे उमेदवारी अर्ज दाखल केले. खूप समजूत काढूनही ते मागे हटेनात. शेवटी मग कटुता टाळावी म्हणून रावसाहेबांनी व त्यांच्या मित्रांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली. पण उमेदवारी मागे घेण्याची रीतसर मुदत तोवर टळून गेली होती. त्यामुळे त्यांची नावे मतपत्रिकेवर तशीच राहून गेली! अर्थात निवडणूक लढवायची नाही असे पूर्वीच ठरवले असल्यामुळे रावसाहेबांच्या गटाने आपला प्रचार वगैरे अजिबात केला नव्हता. पण तरीही त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द विचारात घेऊन सभासदांनी त्यांच्याच गटाला आपली मते दिली व त्यामुळे दोन अपवाद वगळता सर्व जागांवर रावसाहेब व त्यांचेच सहकारी पुन्हा निवडले गेले; त्यांना पदाचा मोह माझ्याचसाठी फुललो नसे मी २७९ ...