पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोसायट्यांप्रमाणे सर्व आलेले दूध एकत्र करून, त्या एकत्रित दुधाचा स्निग्धांश मोजून, त्यानुसार मग जमा झालेल्या सर्व दुधाला एकच भाव न देता दुधाच्या प्रतीनुसारच ज्याला त्याला भाव दिला जायचा. आपापल्या दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांना आपोआपच प्रोत्साहन मिळाले. सोसायटीची झपाट्याने भरभराट होऊ लागली. अतिशय मोक्याच्या जागी तिची स्वतःची, सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशी, इमारत उभी राहिली. दूधसंकलनासाठी सोईस्कर असा मोठा ओटा आणि ट्रकमध्ये दुधाचे कॅन्स भरण्यासाठी सोईस्कर उंचीचा प्लॅटफॉर्म बांधला गेला. दूधतपासणीसाठी लहानशी प्रयोगशाळा, कार्यालय, गाईंच्या खाद्यासाठी लहानसे गोदाम, बाइफचे डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस यांच्यासाठी स्वतंत्र दालन अशा सर्व सुविधा बांधकाम करतानाच विचारपूर्वक तयार केल्या गेल्या. इमारतीच्या पुढे भरपूर मोकळी जागा होती. चारी बाजूंनी कंपाउंड घालून ती बंदिस्त केली गेली. गोपालकांचे मेळावे तिथे भरवले जाऊ लागले. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या तज्ज्ञांना तिथे आमंत्रित केले जाई व त्यांच्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ मिळू लागला. जास्त दूध देणाऱ्या गाईंची पैदास हा आदर्श दुग्धव्यवसायाचा एक भाग झाला. तो महत्त्वाचा होता यात शंकाच नाही; कारण जिथे रोजचे सरासरी फक्त दीड- दोन लिटर दूध एका गाईमागे मिळत असे तिथे आता एकदम सरासरी वीस- बावीस लिटर दूध मिळणे, दूध उत्पादन दसपटीने वाढणे, हा एक चमत्कारच होता. शेतकऱ्यांच्या गोठ्यात जेव्हा अशा गाईचे दूध काढले जाई तेव्हा ते भरून घेताना घरातली सगळी भांडी अपुरी पडत. घरची मंडळी तोंडात बोट घालून दृश्य बघत राहत. पण या वाढीव दूध उत्पादनाचे संकलन, शास्त्रशुद्ध वर्गीकरण आणि नंतर शीतवाहनांतून त्या दुधाचे ग्राहकांपर्यंत वितरण हा सगळा पुढचा भागही तितकाच महत्त्वाचा होता. दुधापासून आइसक्रीम तयार करणारी ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी सोसायटी. शेतकऱ्यांना भरपूर पैसा या सोसायटीने मिळवून दिला. सोसायटीने आणखीही एक मोठे काम केले. गाईंची पूजा करणाऱ्या आपल्या देशात आजारी पडणाऱ्या गाईंचे विलक्षण हाल होत असत आणि त्यांची तडफड उघड्या डोळ्यांनी बघत राहण्यापलीकडे सर्वसामान्य शेतकऱ्यापुढे काही पर्यायही नव्हता. कारण ग्रामीण भागात पशुवैद्यकांचा प्रचंड तुटवडा होता. पुणे किंवा नगर येथे नेऊन आजारी गुरांवर उपचार करणे खूपच गैरसोयीचे किंबहुना जवळपास अशक्यच होते. रावसाहेबांचे थोरले जावई बद्रिनाथ देवकर यांची कोपरगावजवळ टाकळी या अजुनी चालतोची वाट... २७६