पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हळूहळू रावसाहेबांकडेही उत्तम संकरित गाईंचा कळप तयार झाला. रोज सरासरी दोनशे ते अडीचशे लिटर दूध ते विकू शकत होते. पण या आधुनिक दुग्धोत्पादनाचा प्रयोग त्यांनी केवळ स्वतःपुरता सीमित ठेवला नाही. मणिभाईंच्या जोडीने संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात त्यांनी या तंत्राचा प्रसार केला. या कामात सहकारी साखर कारखान्यांचेही मोठे सहकार्य त्यांना लाभले. आपल्या स्थानिक गाईंकडून कृत्रिम गर्भधारणेद्वारे होलस्टिन व जर्सी या संकरित गाई जन्माला घालायची एक शास्त्रशुद्ध व कार्यक्षम यंत्रणा बाइफने विकसित केली होती. कृत्रिम गर्भधारणेसाठी नायट्रोजनच्या सिलिंडरमध्ये ठेवलेले उच्च दर्जाचे फ्रोझन सिमेन (गोठवलेले रेत) पुरवावे लागे. त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यक लागत. ही सुविधा पुरवणारी केंद्रे बाइफने जागोजागी उभारली. जेव्हा गरज निर्माण होई तेव्हा शेतकरी अशा एखाद्या जवळच्या केंद्रावर फोन करे वा निरोप पाठवे व मग डॉक्टर फ्रोझन सिमेन घेऊन त्या शेतकऱ्याच्या गोठ्यावर जात व कृत्रिम गर्भधारणेचे काम करत. गोसंवर्धनाच्या या उपक्रमातील रावसाहेबांच्या सहभागाबद्दल बाइफचे विद्यमान अध्यक्ष डॉ. गिरीश सोहनी लिहितात : "संकरित गोपैदाशीचा विचार पटून रावसाहेब स्वतः कार्यक्रमात सहभागी झालेच, पण त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. रावसाहेबांनी स्वतः संकरित गाईंची पैदास करण्याचा निर्णय घेतला तो किस्सा फारच मनोरंजक आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या भानुदासला त्यांनी सांगितले, 'पुन्हा जेव्हा आपल्या गाई माजावर येतील, तेव्हा त्यांना वळू लावू नकोस. आम्हांला ताबडतोब कळव. आपल्याला गाईला इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरला बोलवावे लागेल.' हे ऐकून चक्रावलेल्या भानुदासने वहिनींकडे गाणे मांडले की 'साहेब काहीतरी भलतेच सांगत आहेत!' संकरित गोपैदाशीच्या कार्यक्रमाविषयी जनमानसात त्याकाळी असे अज्ञान होते. या पार्श्वभूमीवर रावसाहेब व महाराष्ट्रातील इतर नेतृत्वाने मणिभाईंबरोबर जे योगदान दिले, त्यामुळेच महाराष्ट्रात दूधगंगा वाहू शकली. ( प्रेरणापर्व, पृष्ठ ८५) जे स्वतः च्या जीवनात फायदेशीर ठरले ते समाजापर्यंत पोचवायचे ही रावसाहेबांची भूमिका होती व त्याच भूमिकेतून त्यांनी श्रीरामपूर दूध उत्पादक सहकारी सोसायटीची स्थापना केली. जसजसा संकरित गाईंचा प्रसार होत गेला तसतसे सोसायटीचे दूधसंकलन वाढू लागले. गुणवत्ता पाहूनच इथे दूध स्वीकारले जाई व इतर माझ्याचसाठी फुललो नसे मी २७५