पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि ही चळवळ भ्रष्टाचारमुक्त ठेवणे ही आपलीही जबाबदारी आहे हे सरकारच्या मनावर ठसवणे हा या चळवळीमागचा रावसाहेबांचा उद्देश मात्र तसा असफलच राहिला, असे आज मागे वळून पाहताना दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण कारखान्यांनी आपल्या माणसाला नोकरी द्यावी, उसाला जास्तीत जास्त भाव द्यावा, आपल्याला हवा तेव्हा अॅडव्हॉन्स द्यावा एवढीच सर्वसामान्य सभासदांची अपेक्षा राहिली. संचालक व्यक्तिश: भ्रष्ट आहेत की प्रामाणिक हा मुद्दा त्या सर्वसामान्य सभासदांनी कायम गौणच मानला. सरकारने, म्हणजेच सत्ताधारी पक्षनेतृत्वानेदेखील, आपल्याला जास्तीत जास्त मते मिळवून देईल तो चेअरमन आपला व आपण नेहमी त्याचीच पाठराखण करायची, तो कितीही भ्रष्ट असला तरी त्याकडे मग दुर्लक्ष करायचे अशी स्वार्थकेंद्रित भूमिका घेतली. नैतिक मूल्यांचा आग्रह सभासदांनी किंवा सरकारनेही कधीच धरला नाही. परिणामतः काही सन्माननीय अपवाद वगळता एकूण सहकारी चळवळ अधिकाधिक भ्रष्ट होत गेली. सहकारातील भ्रष्टाचाराविरुद्ध दिलेल्या त्या तत्त्वाधिष्ठित लढ्याला दहा वर्षे उलटून गेल्यानंतरची एक घटना शेवटी नमूद करावीशी वाटते. रावसाहेब म्हणतात, "यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या अखेरच्या दिवसांत अण्णासाहेब एकदा त्यांना भेटून आले होते. त्या भेटीत साहेब उद्गारले होते की, 'अण्णासाहेब, तुमचे बंधू सुप्याच्या बंगल्यावर माझ्यापुढे सहकारातील अनिष्ट बाबी व त्यातील पुढाऱ्यांसंबंधी बोलले होते. त्यांचे ते बोलणे त्यावेळी मला रुचले नव्हते. पण काळाने त्यांचे बोलणे सत्य ठरवले आहे.' साहेबांचे हे उद्गार अण्णासाहेबांच्या तोंडून ऐकून मला मनस्वी समाधान वाटले. " ज्याला संघर्ष म्हणता येईल असा रावसाहेबांनी लढवलेला हा शेवटचा लढा. उर्वरित आयुष्यातील त्यां • वाटचाल ही विधायक कामाच्या मागे आपले बळ उभे करणारीच ठरली. कशाच्यातरी विरोधात उभे राहण्यापेक्षा कशाच्यातरी बाजूने उभे राहणे त्यांनी महत्त्वाचे मानले. रावसाहेबांच्या बहरलेल्या वकिलीबद्दल लिहिताना सहकारातील भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्याप्रमाणेच त्यांच्या शेतीबद्दल व गोपालनाबद्दल लिहिणे हे विषयांतर ठरणार नाही. कारण वकिलीबरोबरच त्यांच्या जीवनाचे ते अंगही बहरत गेले; किंबहुना दोन्ही बहर समकालीनच होते. रावसाहेब तसे हाडाचे शेतकरी होते; वकिलाचा काळा कोट चढवल्यावरही अंतर्यामीचे शेतीप्रेम कायमच होते. त्यामुळेच अण्णासाहेबांची कोल्हारची शेती माझ्याचसाठी फुललो नसे मी २७१