पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूचनेप्रमाणे ते दोघेही राम जेठमलानी यांच्याकडे गेले. पण शेवटी सर्व गैरव्यवहार थांबवायचे चेअरमननी आश्वासन दिले आणि जवळजवळ तीन वर्षे चाललेला हा लढा रावसाहेबांनी मागे घेतला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी अशोक सहकारी कारखान्यात निवडणूक जाहीर झाली. दोन-तीनशे कार्यकर्ते एक मोर्चा घेऊन आले आणि रावसाहेबांनी निवडणूक लढवावी आणि कारखान्याचे चेअरमनपदही भूषवावे अशी त्यांनी विनंती केली. ती मात्र रावसाहेबांनी तत्काळ फेटाळून लावली. ते म्हणाले, “गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. पण मी चेअरमन होणं तुम्हांला मानवणार नाही. मी गेस्ट हाउसचा भंडारा बंद करीन. गुणवत्ता नसेल तर नेमणूक करणार नाही. कारखान्यातील अनावश्यक नोकरभरती कमी करीन. अॅडव्हॉन्स देणार नाही. स्वतः कारखान्याची गाडी वापरणार नाही आणि तुम्हांलाही वापरू देणार नाही. आज तुम्ही जसं मला एकमताने चेअरमन बनवत आहात तसाच मग तुम्ही माझ्याविरुद्ध एकमताने अविश्वासाचा ठराव आणाल आणि मला चेअरमनपदावरून हटवाल ! माझा लढा खुर्चीसाठी नव्हता. सत्तेपासून दूर राहण्याचं पथ्य मी पाळतो. तुम्हांला मिळालेली सत्ता तुम्ही स्वच्छ कारभारासाठी वापरावी एवढाच माझा आग्रह आहे. " 1 ज्या पद्धतीने रावसाहेबांनी या लढ्याचा शेवट केला ती पद्धतदेखील खूप आवर्जून नोंद करावी अशीच होती. 'कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व चाळीस गावांमध्ये आपण आता एकत्रित सभा घेऊ या व ग्रामस्थांशी संवाद साधू या,' असे त्यांनी चेअरमन भास्कर पाटील यांना सुचवले आणि त्यानुसार भास्कर पाटलांनी चाळीस सभांचे आयोजन केले. "सर्वांनी आता भास्कर पाटलांनाच पाठिंबा द्यावा. आमचा त्यांच्यावर वैयक्तिक राग कधीच नव्हता. आमचा लढा हा सत्तेसाठी मुळीच नव्हता, तो फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. आता यापुढे कारखान्याचा कारभार एकजुटीने चालावा आणि कोणीही त्यात गट, तट वा राजकारण आणू नये," असे आवाहन या प्रत्येक सभेत रावसाहेबांनी भास्कर पाटलांच्या उपस्थितीतच केले. श्रोत्यांवर या आव्हानाचा खूपच प्रभाव पडला व आदल्या तीन वर्षांत गढुळलेले वातावरण त्यामुळे एकदम निवळले. कारखान्याचा कारभारही त्यानंतर सुधारला. नैतिकतेच्या प्रश्नावरून तीन वर्षे चाललेल्या एका आंदोलनाची आदर्श म्हणावी अशीच ही सांगता होती. 'Hate the sin, not the sinner,' ('द्वेष पापाचा करा, पापी माणसाचा नको') असे गांधीजी म्हणत व त्या तत्त्वानुसारच हा लढा लढवला गेला आणि समाप्तही केला गेला. M अशोक सहकारी साखर कारखान्याचा कारभार नंतर उत्तम चालू लागला तरी एकूण सहकारी चळवळीला सदाचाराची जोड हवी हे सभासदांच्या मनावर ठसवणे अजुनी चालतोची वाट... २७०