पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खरेदी विक्री संघ, श्रीरामपूर सहकारी सूत गिरणी, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व युनायटेड वेस्टर्न बँक यांच्या श्रीरामपूर शाखा, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे श्रीरामपूर डिव्हिजन ऑफिस, श्रीरामपूर भागातील रेल्वेचे कार्यालय या सगळ्यांची कामेही रावसाहेबांकडेच होती. तालुक्यातील टेकावडे, डाकले, खटोड, सोमाणी यांसारख्या सर्व बड्या व्यापाऱ्यांची कायदेशीर कामेही रावसाहेबांकडेच होती. आणि हे सर्व करत असतानाच गरिबातल्या गरीब पक्षकारांच्या केसेसही त्यांनी तितक्याच निष्ठेने लढवल्या. संपत लखू तारडे व वामन पाटील उंडे यांच्यासारखे शेतकरी, मेरी अब्राहम वडाळकर यांच्यासारख्या मिशनरी डॉक्टर, चंदूबाई देवकर यांच्यासारखी सामान्य फळवाली व दादाशेठ डहाणूकर यांच्यासारखे एक बड़े उद्योगपती अशा केवळ पाच प्रातिनिधिक पक्षकारांविषयी इथे थोड्याफार विस्ताराने लिहिता आले. सगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण पक्षकारांची दखल घेणे हे केवळ अशक्य आहे. पण या प्रातिनिधिक उदाहरणांवरून रावसाहेबांचा एकूण वकिली व्यवसाय कशा स्वरूपाचा होता याची वाचकांना थोडीफार कल्पना येऊ शकेल. कुठल्याही व्यावसायिकाला उत्तम सहकान्याची गरज ही लागतेच; वकिली व्यवसायात तर ही फारच असते. असंख्य बारीकसारीक गोष्टींच्या नेमक्या व अचूक नोंदी ठेवणे खूप आवश्यक असते. याबाबतीत रावसाहेब सुदैवी ठरले. रावसाहेबांना कारकून या नात्याने बाबुराव तुकाराम झिने आणि त्यांच्यानंतर मुरलीधर शिंदे यांची खूप मदत झाली. दोघांनीही अतिशय निष्ठेने व खूप कष्ट घेऊन काम पाहिले. यांच्या ऑफिसात बऱ्याच वकिलांनी अनुभवासाठी तसेच त्यांचे मदतनीस म्हणून काम पाहिले. गोविंदराव आदिक हेदेखील काही दिवस त्यांचे मदतनीस म्हणून काम पाहत होते. मदतनीस म्हणून सर्वाधिक राहिले ते म्हणजे अॅड. भागचंदजी चुडीवाल. अतिशय निष्ठेने आणि आज्ञाधारकपणे त्यांनी काम पाहिले. ते हल्ली श्रीरामपूरच्या ब्लाइंड असोसिएशनची शाखा चालवीत असून त्या संस्थेत जिल्हा व राज्य पातळीवरही ते पदाधिकारी या नात्याने काम करतात. या कामासाठीही रावसाहेबांनी त्यांना सतत उत्तेजन दिले. चुडीवाल हे मारवाडी समाजातले. त्यांना रावसाहेबांनी इतके महत्त्व द्यावे हे रावसाहेबांच्या काही स्वजातीय सहकाऱ्यांना आवडत नसे. पण इतर सर्व बाबींप्रमाणे याही बाबतीत रावसाहेबांची भूमिका पूर्णतः जातिधर्मनिरपेक्ष असे. त्यांच्याविषयी अजुनी चालतोची वाट... २६०