पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाखवले. पहिल्याच भेटीत रावसाहेबांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. एकदम टनाला सात रुपये भाव वाढवून मिळाल्यामुळे ऊसवाले शेतकरी खूष झाले. दरवर्षी रावसाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून भाव ठरवून घेण्याची प्रथा यानंतर महाराष्ट्र शुगरमध्ये सुरू झाली. ही ऊस उत्पादक शेतकरी चळवळीच्या कार्याची फलश्रुती होती. त्यामध्ये या संघटनेला एक प्रतिष्ठा लाभली. दरवर्षीच्या वाटाघाटींमधून तडजोडीचा एक फॉर्म्युलाच तयार केला गेला. संगमनेर, राहुरी आणि अशोक या परिसरातील तीन सहकारी साखर कारखान्यांच्या सरासरीइतका भाव कंपनीच्या व्यवस्थापनाने देत जावा असे ठरवण्यात आले. या समझौत्याचा पुढचा एक भागही रावसाहेबांनी नोंदवला आहे व तो खूप बोलका आहे. काही दिवसांनी डहाणूकर पुन्हा एकदा टिळकनगरला आले. रावसाहेबांना त्यांनी त्यांच्या तेथील बंगल्यावर भेटायला बोलावले. उसाच्या दराबाबत झालेल्या तडजोडीत रावसाहेबांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यानंतर त्यांनी तडजोडीचे काम केल्याबद्दल किती फी द्यायची म्हणून त्यांनी विचारले व मॅनेजरला चेकबुक आणण्यास सांगितले. रावसाहेब अवाक् झाले. म्हणाले, "माझे हे सामाजिक काम आहे. असे कार्य म्हणजे समाजसेवेच्या व्रताचा भाग असल्याचे मी मानतो." दादासाहेब म्हणाले, "माफ करा, मला कल्पना नसल्यामुळे मी फीबद्दल बोललो, पण माझे बोलणे माझ्या पूर्वअनुभवावर आधारित आहे. आमच्याकडे आर्थिक मागण्यांबाबतच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी तुमच्यासारखे संबंधित उपस्थितच असतात. मिटवामिटवी झाल्यावर ते कंपनीच्या दारावर पठाणासारखे तगाद्याला उभे असतात. त्यांची अपेक्षापूर्ती केली नाही तर त्यांची अर्वाच्य भाषा आम्हांला ऐकण्याचे प्रसंग उद्भवतात. तुम्ही तर आहात. त्यामुळे तुम्ही फी घेणेही रास्त ठरेल. पण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र मला माफ करा. मला तुमच्याशी परिचय झाल्याचे मनस्वी समाधान वाटत आहे." काही दिवसांतच महाराष्ट्र शुगर मिल्सचा कायदा सल्लागार म्हणून रावसाहेबांची निवड करण्यात आली. बेलापूर शुगर मिल्स या श्रीरामपुरातील दुसन्या खासगी साखर कारखान्याचे काम करताना रावसाहेबांना आलेला एक अनुभव. त्या कंपनीच्या एका लिफ्ट स्कीमचा रावसाहेबांनी तयार केलेला मसुदा कंपनीला खूप पसंत पडला होता. त्या कामाचे बिल पाठवून द्यावे असे कंपनीने त्यांना सांगितले. त्यानुसार रावसाहेबांनी दोनशे रुपयांचे बिल पाठवून दिले. बिल पाहताच कंपनीचे एक उच्चधिकारी तत्परतेने रावसाहेबांपाशी आले आणि म्हणाले, "बिल बनवताना तुमची काहीतरी अजुनी चालतोची वाट... २५८