पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाढतो तिथले संस्कार अगदी स्वाभाविकरीत्या आपल्यावर होतात. दादा व बाईंपासून मिळालेली शिकवण सोडली तर रावसाहेबांच्या जाणीवविश्वावर झालेला पहिला सुस्पष्ट संस्कार हा त्या परिसरात अभावितपणे कानावर पडत गेलेल्या संगीताचा आहे. जात्यावरचे गाणे हे त्यांनी ऐकलेले पहिले गाणे. ते म्हणतात, "भल्या पहाटे माझी आई आणि चुलत्या जात्यावर दळायला बसायच्या. गाणी म्हणत दळण्याचं काम चालायचं. अशा वेळी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून डुलक्या घेत घेत झोप घेणं यात मला मोठी मजा वाटायची." घरालगतच्या दाट झाडीतून कानावर पडणारा चिमण्या, कावळे, होले, मैना, भारद्वाज, बगळे, कोतवाल, साळुंक्या, पोपट यांचा किलबिलाट त्या तांबडफुटीच्या प्रहरी खूप गोड वाटायचा. अधूनमधून कोंबड्यांच्या आरवण्याची आणि गाईंच्या हंबरण्याचीही त्याला साथ असायची. गावातल्या देवळात टाळ- ठ-मृदंगाच्या साथीने संध्याकाळी भजने होत. मुलांची खेळायची जागा देवळालगतच असल्याने तीही कानावर पडत. शेतावर जायला लागल्यावर तिथल्या मोटकऱ्यांची गाणीही कानावर पडू लागली. शेतकरी पीककापणीच्या वेळी काम सुसह्य व्हावे म्हणून अगदी तालासुरात काही गाणी म्हणत असत. उदाहरणार्थ : भलरी दादा भलरी, भलरी दादा भलरी, काळी आई आमची रं, आमची रं, घाम गाळू, मोत्ये पिकवू, गड्या शेतावरी रं, शेतावरी ! उसाच्या गुन्हाळात चरकाभोवती फिरणाऱ्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असत. त्यांचाही मंजूळ असा आवाज कानावर पडत राहायचा. ाळेत चालीवर कवित रोजच व्हायचे. गावातील लग्नसमारंभांतही गाणी म्हटली जायची. मुलीला सासरी पाठवताना 'ज्याची होती त्याने नेली, आमची माया वाया गेली' हे एक ठरलेले गाणे असायचे व ते ऐकताना सर्वच माहेरच्या माणसांचे डोळे पाण्याचे भरून यायचे. सिनेमातली गाणी व एकूणच गायकाचे गाणे हा प्रकार मात्र त्यांना फारच उशिरा माहीत झाला. सिन्नर या तालुक्याच्या ठिकाणी ते एकदा बाजाराला गेले असताना त्यांनी आयुष्यात प्रथम ग्रामोफोन बघितला. ती फिरणारी गोल काळी तबकडी, कर्ण्यातून फेकले जाणारे ते गाण्याचे सूर आणि तबकडीवरचे ते आपल्या धन्याचा, म्हणजेच ग्रामोफोनचा जनक थॉमस एडिसनचा आवाज (His Master's Voice) कान टवकारून ऐकणाच्या एडिसनच्या कुत्र्याचे चित्र यांचे त्यांना खूप अजुनी चालतोची वाट... २४