पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केला. कै. यशवंतराव चव्हाण व रावसाहेब यांचा खूप परिचय होता. रावसाहेबांची इच्छा असती तर यशवंतरावांच्या चालत्या काळात आणि माझ्या राजकीय संबंधांमुळे रावसाहेबांना उच्चपदी जाणे सहज शक्य होते. मोहजालापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्यात रावसाहेबांचा हातखंडा आहे. रावसाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजाचे मोठे शक्तिस्थानच समजले पाहिजे. भारतीय समाज सध्या मानवी संबंधांच्या, नीतिमूल्यांच्या जबरदस्त अशा संकटातून जात आहे. रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या नीतिमूल्यांवर आधारलेले जीवन जगणाऱ्या दीपस्तंभासारख्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वच भारताला सध्याच्या अरिष्टांतून बाहेर काढू शकेल असे वाटते. " १२ जानेवारी १९९३ रोजी, आपल्या ७१व्या वाढदिवसाअगोदर फक्त नऊ दिवस, या महादेव मळ्यातच अण्णासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. पण रावसाहेबांच्या रूपाने आजही ते महादेव मळ्यात वावरत आहेत असा भास होतो. आणि हे केवळ दिसण्यातल्या साधर्म्यामुळे नव्हे. अजुनी चालतोची वाट... २३८