पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- विचारमंथनातूनच नेतृत्व उभे राहील – जे कणखर नि विजिगीषू असेल, ज्याला आपल्यापुढील जटिल सामाजिक, आर्थिक समस्यांची नि कुटिल राजकीय डावपेचांची सुजाण समज असेल; ज्यांच्यामुळे अनेक प्रश्नांच्या चिखलात रुतलेल्या देशाचे रथचक्र वर येईल नि 'सर्वेऽपि सुखिनः संतु' या चिरवांच्छित ध्येयाकडे आम्हांला तडफेने वाटचाल करता येईल. " अण्णासाहेबांना महात्मा फुले यांचे चरित्र व स्वत:चे आत्मचरित्रही लिहायची खूप इच्छा होती. पण दुर्दैवाने त्यांच्या हातून प्रत्यक्षात हे लेखन होऊ शकले नाही. आयुष्यभर निरलस भावनेने भरीव असे सामाजिक काम करूनही अण्णासाहेबांना पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही, त्यांच्या योगदानाची योग्य ती नोंद अभ्यासकांनी घेतली नाही. असे का झाले असावे याचे विश्लेषण करताना रावसाहेब म्हणतात: "व्यक्तीचे कार्य कितीही मोठे असो, पण त्या व्यक्तीला तसे घरगुती नात्यातील सत्ता किंवा संपत्तीवाले वारस नसले आणि त्या व्यक्तीने स्वतः एखाद्या संस्थेचे 'संस्थान' ताब्यात ठेवलेले नसले, तर त्या व्यक्तीच्या कार्याचा तिच्यापश्चात फारसा गौरव होत नाही. याउलट एखाद्याचे काम कसेही का असेना, पण त्याच्यापश्चात वर उल्लेख केल्याप्रमाणे सत्तेचा, मत्तेचा आणि संस्थारूपी संस्थानाचा वारसा असला तर तथाकथित कार्याच्या 'गाढवाचा' 'गंगाधर' करणे अवघड जात नाही. गल्लीबोळांत पुतळे आणि नावाच्या पाट्याही लागू शकतात. भारताच्या सामाजिक जीवनाची ही शोकांतिका आहे. अण्णाभाऊंनी घरात सत्तेचा वारस निर्माण केला नाही आणि संस्थानही ताब्यात ठेवण्याचा कधी विचार केला नाही. ते सतत निरिच्छ आणि प्रसिद्धिपराङ्मुख राहिले; केवळ देशहित डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी काम केले. त्यामुळे बहुधा त्यांच्या पश्चात त्यांचे काम आणि त्यांचे क्षित राहिले. " तमत्त्व दहा जून १९८८ रोजी रावसाहेबांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त अण्णासाहेबांनी श्रीरामपुरातील त्यांच्या घरासमोरील पटांगणात त्यांचा सत्कार आयोजित केला होता. आमंत्रितांची खूप गर्दी उसळली होती. ते म्हणतात, "अण्णाभाऊंच्यामुळे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव झाला. आम्ही उभयता अक्षरश: भारावून गेलो. मोठ्या भावाने धाकट्या भावाचे असे कौतुक करावे, हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग." त्याप्रसंगी रावसाहेबांचे अण्णासाहेबांनी केलेले मूल्यमापन लक्षणीय आहे. अण्णासाहेब म्हणतात : " "मनाला न पटणाऱ्या परिस्थितीशी तडजोड करावयाची नाही यामुळे रावसाहेबांनी राजकीय जीवनापासून हळूहळू स्वतःला दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २३७