पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळवता येतो हे सिद्धही केले. कुठल्याही प्रश्नाकडे बघताना अगदी वेगळा असा एखादा विचार मांडायची एक भेदक दृष्टी अण्णासाहेबांकडे होती. उदाहरणार्थ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक येथे ३० नोव्हेंबर १९९० रोजी आयोजित केलेल्या 'नव्या दिशा' या विषयावरील एका परिसंवादाचे उद्घाटन करताना ते म्हणाले : "नव्याने सुरू झालेल्या विद्यापीठांची वाट मळलेली नाही; ती घनदाट जंगलातून जाणारी असेल. या विद्यापीठाला खूप लांबचा पल्ला गाठावयाचा आहे. उच्च शिक्षणासाठी आपण राज्यात व देशात जी भांडवल गुंतवणूक करतो, त्याचे फलित अपेक्षेप्रमाणे मिळत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता मुक्त विद्यापीठासाठी होणाऱ्या गुंतवणुकीबाबत आपल्याला प्रथमपासून सावध राहायला हवे... विद्यापीठांचे उद्दिष्ट काय असावे ? 'It should be nothing less than creating an ethos that would produce young men and women of character, committed to service and development of the country.' प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतरच्या ४४ वर्षांच्या शिक्षणाच्या प्रसारातून हे उद्दिष्ट साध्य झाले आहे का ? देशात सुशिक्षित माणसांना शारीरिक श्रम करण्यात कमीपणा वाटतो. परंपरागत संस्कृतीत फक्त ब्राह्मण शारीरिक श्रम करण्यात संकोच बाळगत, आता शिक्षणातून सगळा समाजच ब्राह्मण बनू पाहत आहे." अण्णासाहेबांचे हे शेवटचे वाक्य महत्त्वाचे, एक वेगळीच दृष्टी देणारे आहे. आपला समाज जरूर त्या गतीने प्रगती करू शकत नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या लोकांच्या पायात असलेली अंधश्रद्धेची लोढणी हे आहे असा अण्णासाहेबांचा निष्कर्ष होता. बालपणापासूनच त्यांनी समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा अनुभवला होता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन रषदेचे उद्घाटन एण्याचे " निमंत्रण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून आले तेव्हा ते त्यांनी तत्परतेने स्वीकारले. स्वातंत्र्यानंतर राजकारण आणि सामाजिक सुधारणा यांची जवळजवळ फारकत झाली आहे, असे दाखवून ते या परिषदेत म्हणाले, "अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या जनसमूहाला मुक्त केल्याशिवाय खरे प्रभावी राजकारण करता येणार नाही याची जाणीव राजकीय नेत्यांनी ठेवली नाही. उलट बहुसंख्य राजकारणी मंडळींनी जनतेच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन राजकारण चालविण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी ते मुहूर्त पाहू लागले. एवढेच नव्हे तर दैवते, बुवा आणि बाबा यांची आराधना करून त्यांचा कौल मागण्यापर्यंत प्रथम श्रेणीच्या समजल्या अजुनी चालतोची वाट... २३४