पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेतकऱ्यांच्या एक प्रचंड मोर्चा कम्युनिस्ट पक्षाने नेला होता. शेतकऱ्यांवरील कर्जे शासनाने तहकूब करावी या प्रमुख मागणीसाठी. संगमनेर परिसर कायम दुष्काळी. त्यावर्षीतर दुष्काळाची तीव्रता अधिकच होती. सारे शेतकरी कर्जबाजारी बनले होते. त्यावेळी अण्णाभाऊंची वकिली चालू झाली होती; वेळात वेळ काढूनच ते चळवळीत सहभागी होऊ शकत होते. पण शेतकरी कुटुंबातलेच असल्याने कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी कसा हवालदिल असतो याची त्यांना पूर्ण कल्पना होती व म्हणूनच या मोर्च्यात ते सहभागी झाले. नेमक्या याच वेळी सरकारने कम्युनिस्टांविरुद्ध अगदी कडक धोरण स्वीकारायचा निर्णय घेतला होता व त्यामुळे मोर्चात सहभागी झाल्याबद्दल इतर नेत्यांप्रमाणे अण्णाभाऊंनाही अटक केली गेली. नंतरचे २१ महिने त्यांना तुरुंगातच काढावे लागले. येरवड्याच्या तुरुंगात त्यावेळी कॉ. सुळे, कॉ. चारी अशा पुढाऱ्यांसह दोनशेच्या आसपास कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. त्यांच्यापैकी जहाल मंडळी माओ त्से-तुंगवर टीका करत. त्यांच्यावर मॉस्कोचा प्रभाव होता. स्टॅलिनची व म्हणून कॉमिन्टर्नची अधिकृत भूमिका त्यावेळी अशी होती, की क्रांती फक्त कामगारच करू शकतात; शेतकरी हे नेहमी 'बुइव' असतात. सविता भावे लिहितात : "त्या वेळी ते बरोबर नाही असे मत अण्णासाहेब मांडत. जेलमधील बहुसंख्य कम्युनिस्ट मंडळींनी नंतर त्यांच्यावर बहिष्कार टाकला. कम्युनिस्ट पक्षाचे धोरण कसे चुकीचे आहे हे सांगणारे पत्रक अण्णासाहेबांनी जेलमधून काढले होते. साम्यवाद अयशस्वी होणार हे सांगणारे अण्णासाहेब हे देशातील पहिले पुढारी म्हणता येतील. पण त्यावेळी त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. उलट भांडवलदारांचे हस्तक अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र अण्णासाहेबांचा अभ्यास तुरुंगातही चालूच होता. तेथे त्यांनी लेनीन यांच्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले व त्याचे प्रकाशन कॉ. के. एन. फडके यांच्या हस्ते झाले. पक्षाशी तीव्र स्वरूपाचे मतभेद झाल्यामुळे त्यांनी जे राजीनाम्याचे पत्रक काढले होते, त्यामुळे पक्षाची नाचक्की होईल अशी भीती वाटून कम्युनिस्ट पार्टीने आपणच अण्णासाहेब शिंदे यांची हकालपट्टी केली अशा आशयाचे वृत्त प्रसृत केले. ' }} (कृषिक्रांतीचे सेनानी, पृष्ठ १८९) अण्णासाहेबांच्या मते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय चुका झाल्या नसत्या व राष्ट्रीय चळवळीपासून भारतातील साम्यवादी चळवळ अलग पडली नसती तर अहमदनगर जिल्हा, तेलंगणातील काही भाग व बंगालमधील काही प्रदेश 'येनान' प्रांताप्रमाणे साम्यवादी चळवळीचे बालेकिल्ले बनले असते आणि त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २१९