पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्वमेव बंधुः सखा त्वमेव रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन ही नगर जिल्ह्यातली एक प्रसिद्ध जोडगोळी. अण्णासाहेब शिंदे आणि रावसाहेब शिंदे हीदेखील नगर जिल्ह्यातली, नंतरच्या काळातली, तशीच एक प्रसिद्ध जोडगोळी. अगदी राम- लक्ष्मणांची जोडीच म्हणावी अशी. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे इतकी अभिन्नहृदयी होती, की अण्णासाहेब समजून घेतल्याशिवाय रावसाहेब खऱ्या अर्थाने समजूच शकणार नाहीत. अण्णासाहेबांचा जन्म २१ जानेवारी १९२२चा. म्हणजेच रावसाहेबांपेक्षा ते साधारण सहा वर्षांनी मोठे. मागे वळून पाहताना जाणवते, की दोघांचाही जीवन प्रवास बहुतांशी एकाच दिशेने होत गेला. हा कदाचित योगायोगही असेल पण शिक्षण, वाचनप्रेम, स्वातंत्र्यचळवळ, साम्यवाद, त्यापासून झालेला भ्रमनिरास, वकिली, सहकारी संस्था, शेती, गोपालन, सामाजिक कार्य या प्रत्येक क्षेत्रात अण्णासाहेबांच्या पावलांवर पाऊल टाकूनच रावसाहेबांनी पदार्पण केले. दोघांचीही उंची तशी कमी, एकूण बांधा व चेहरेपट्टी अगदी एकसारखी; जुळे भाऊ वाटावेत अशी. त्यासंदर्भातला एक गमतीदार अनुभव रावसाहेब सांगतात. साम्यवादी चळवळीत असताना वदूद खान नावाचे एक रावसाहेबांचे वरिष्ठ सहकारी होते. मागे त्यांच्याविषयीचा मजकूर आलाच आहे. पुढे वदूद खानांनी पोटापाण्यासाठी मुंबईच्या टाटा ऑईल मिल या कंपनीत सेल्स सुपरवायझर म्हणून पाच-सहाशे रुपये महिना पगारावर नोकरी धरली. अंगभूत कर्तृत्वाच्या बळावर झपाट्याने वर चढत ते कंपनीचे व्हाइस चेअरमन व मॅनेजिंग डिरेक्टर बनले. केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने एकदा अण्णासाहेबांची मुंबईत टाटा ऑईल मिलला भेट होती. भेटीदरम्यान मॅनेजिंग डिरेक्टर या नात्याने वदूदनी त्यांना चहाला बोलावले. दोघेही कम्युनिस्ट चळवळीत असूनही का कोण जाणे, पण त्यांची व त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २१३