पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरेसे नसते. अभ्यासात कायद्याची कलमे वाचण्यात येतात आणि प्राध्यापकांच्या शिकवण्यातदेखील ती कानांवरून जातात. मात्र त्यांच्या अंमलबजावणीसंबंधीच्या गुंतागुंतीची पुरेशी कल्पना आलेली नसते. त्याचबरोबर दावा, फिर्याद, अर्ज अपील इत्यादीचा तर्जुमा तयार करणे, तो कोर्टात दाखल करणे, त्यासाठी आवश्यक असलेला पुरावा व माहिती पक्षकाराकडून घेणे व कायद्यातील तरतुदीप्रमाणे योग्य वेळी आवश्यक तो पुरावा कोर्टात सादर करणे या बाबींची कॉलेजमधील शिक्षणात कल्पना आलेली नसते. साक्षीदाराचा जबाब घेणे, उलटतपासणी घेणे, पक्षकाराची सर्वंकष बाजू न्यायाधीशासमोर मांडणे इत्यादी सर्व बाबी या व्यवसायात प्रवेश केल्यावरच खऱ्या अर्थाने माहीत होतात. कागदपत्रांची डोळ्यांत तेल घालून छाननी करणे आणि त्याशिवाय संबंधित कायद्यातील कलमांचा अभ्यास आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांचे त्यासंबंधीचे निवाडे यांचे वाचन ह्या बाबी खूपच परिश्रमाच्या असतात. पक्षकाराशी झालेल्या संवादातून आणि त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या गबाळातून कधीकधी अनपेक्षितपणे केसला कलाटणी देणारा पुरावा हाती येऊ शकतो. निरक्षर आणि अडाणी अशा ग्रामीण भागातील पक्षकारांच्या बाबतीत असा शोध घेणे आवश्यकच असते. हुशारी तर गृहीतच आहे, पण एकूण वकिलाचे काम हे अक्षरश: ढोर मेहनतीचेच काम असते." ( ध्यासपर्व, पृष्ठ २९९, ३००) सुरुवातीच्या त्या दिवसांत पुढेपुढे अनेक खटल्यांमध्ये असेही होऊ लागले, की एक बाजू अण्णासाहेबांकडे तर दुसरी बाजू रावसाहेबांकडे असायची. दोघांनाही अटीतटीने एकमेकांविरुद्ध कोर्टात झुंजावे लागे. एकदा तर दोन बाजूंचे पक्षकार सख्खे भाऊ आणि दोन्ही बाजूंचे वकीलही सख्खे भाऊ अशी परिस्थिती झाली! एक गोष्ट नक्की; केसचा निकाल कसाही लागला, तरी दोन्ही त्यांच्या प्रामाणिकपणावर कधी किंचितसाही संशय घेतला नाही. च्या रांनी पण पुढे अण्णासाहेबांना सहकारी क्षेत्राच्या कामामुळे कोर्टात येणे अवघड होऊ लागले. त्यांनी एक दिवस सांगितले, "रावसाहेब, एकमेकांविरुद्ध काम घेणे आता बंद व्हावे. मला कोर्टात हजर राहणे अवघड होत आहे. अशा वेळी माझेही काम तूच पाहायला पाहिजे." निर्णय पक्का झाला आणि एकमेकांविरुद्धची पक्षकारांच्या वतीने न्यायालयात होणारी दोघा भावांची लढाई संपुष्टात आली. पुढे पुढे अण्णाभाऊंचे न्यायालयाचे बरेचसे काम रावसाहेबच पाहू लागले. त्या आधीच अण्णासाहेबांनी त्यांना स्वतंत्र ऑफिस थाटण्याचा सल्ला दिला होता आणि त्यात सक्रिय मदतही केली होती. अजुनी चालतोची वाट... २१०