पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व सरकारला पाठवल्या. आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी या नोटिसेस होत्या. पुढे कोर्टकाम सुरू झाले. हे काम खूपच किचकट व वेळकाढू होते. त्यात इतरांचा सहभागही आवश्यक होता. बॅ. गोदीवाला, अॅड. सुळे यांच्यासारखे एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचे काम करणारे मुंबईतले काही वकील अण्णासाहेबांच्या ओळखीचे होते. मदतीसाठी अण्णाभाऊंनी त्यांना बोलावून घेतले. पण त्यांना अपिलेट कोर्टात आर्ग्युमेंट्स करण्याची नेहमीची सवय होती. इथल्या कोर्टातील कामाचा त्यांना सराव नव्हता. शिवाय अशा प्रकारच्या केसेस त्यांना अगदी नवख्या होत्या. जेमतेम दोन दिवस ते श्रीरामपुरात राहिले आणि नंतर "तुमच्या इतकं उत्तम काम आम्ही करूच शकणार नाही," असे अण्णासाहेबांना म्हणत ते मुंबईला निघून गेले. सगळी जबाबदारी शेवटी अण्णासाहेबांवरच पडली. हे सर्व काम त्यांनी खंडकऱ्यांकडून कुठलीही फी न घेता केले. " लढ्याला तोंड फुटले आणि शेकडो शेतकरी स्त्री पुरुषांची धरपकड झाली. त्यांच्यावरही श्रीरामपूर कोर्टात स्वतंत्र खटले भरण्यात आले. यांतलेही बहुतेक खटले अण्णासाहेबच चालवत. सुरुवातीच्या काळात अण्णाभाऊंना मदत करणे हेच रावसाहेबांचे मुख्य काम होते. दोघेही एकाच ऑफिसात बसत. धाकट्या भावाला आपण आसरा दिला, पण तो सतत आपल्याच प्रभावाखाली राहिल्यास त्याची स्वतंत्र वाढ खुंटेल, हे अण्णासाहेबांना ठाऊक होते. त्यामुळे काही महिन्यांनंतर आता ल. वि. चंदनापूरकर नावाच्या दुस-या एका वकिलाच्या हाताखाली काम करावे असे त्यांनी रावसाहेबांना सुचवले. चंदनापूरकर हे अण्णासाहेबांचे स्नेही होते. ते पोलीस प्रोसेक्युटर होते. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त सरकारच्या वतीने फौजदारी खटले लढवायचेच काम असे. त्यामुळे त्या वेगळ्या वसाहेबांना अनुभव मिळाला. पुढे चंदनापूरकर वकिलांची श्रीरामपूरहून बदली झाली व त्यांच्या हाताखाली काम करणे संपले. यानंतर मात्र स्वतंत्र व्यवसाय करण्याचे रावसाहेबांनी ठरवले. त्यांची राहण्याची सोय अण्णासाहेबांकडे होतीच, पण आता प्रश्न ऑफिसच्या जागेचा होता. प्रकारच्या कामाचा रावसाहेब ऑफिससाठी जागा शोधत आहेत ही गोष्ट प्रवरानगरचे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कानावर गेली. दोघांचा पूर्वपरिचय होताच. कोर्टाला सुट्टी असली की बऱ्याचदा रावसाहेब प्रवरानगरला जात असत. विखे पाटलांच्या लोणी येथील घरीही त्यांचे जाणे-येणे होत असे. श्रीरामपुरात मेन रोडवर विखे पाटलांची एक इमारत होती. त्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरची दोन खोल्यांची जागा त्यांनी ऑफिससाठी रावसाहेबांना दिली. तसा रावसाहेब लॉ कॉलेजात शिकत दिवस काळ्या कोटाचे... २०७