पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अटकळ होती. त्यांनी पकडले जाणे आवश्यकच होते, कारण कायद्याच्या दृष्टीने ते आत्ताही भूमिगतच होते आणि पकडले जाईस्तोवर तीच अवस्था राहणार होती. त्यानुसार लौकरच घडले. मध्ये दोन दिवस गैरहजर राहून ते कॉलेजला गेले. या कॉलेजात हजेरी अशी सहसा कधी घेतली जायची नाही. पण त्या दिवशी ते गेल्या गेल्या एका वर्गमित्राने सांगितले, की "गेले दोन दिवस हजेरी घेतली जाते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्याही कॉलेजच्या आवारात जा-ये करत आहेत." हे आपल्यासाठीच आहे हे रावसाहेबांनी लगेचच ओळखले व अपेक्षेप्रमाणे त्याच दिवशी सकाळी त्यांना पोलिसांनी पकडले. ही जानेवारी १९५१मधली घटना. प्रत्यक्ष अटक करणारे इन्स्पेक्टर ककेरी हे सुरुवातीला रावसाहेब एखादे भयंकर खतरनाक असे गुन्हेगार आहेत अशा थाटात त्यांच्याशी वागत होते. कारण त्यांना पकडणा-याला दहा हजार रुपयांचे इनाम सरकारने जाहीर केले आहे हे इन्स्पेक्टरना ठाऊक होते. ही रक्कमही त्याकाळी खूप मोठी होती. इन्स्पेक्टरनी त्यांना मोटारीने अहमदनगरला नेले आणि आपले बॉस डी.एस.पी. मोरे यांच्यासमोर हजर केले. त्यांना पाहताच मोरेसाहेब आश्चर्याने म्हणाले, "अरे, तू तर एवढा पोरगेलासा! तू रावसाहेब शिंदे ? आमच्या रेकॉर्डला तर भयंकर धोकेबाज कम्युनिस्ट अशी तुझ्याबद्दलची माहिती आहे! दिसेल तिथे गोळी घाला, असे तुझ्याविरुद्ध आमच्या खात्याचे आदेश आहेत." रावसाहेब काहीच बोलले नाहीत. आता आपले कसे होणार, हे अधिकारी आपल्याला कसे वागवतील, खटला भरून दीर्घकाळ तुरुंगातच डांबून ठेवणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न त्याक्षणी त्यांच्या डोक्यात होते. रावसाहेब घाबरले होते अशातला भाग नाही; अटक करून घ्यायचे ठरवले तेव्हाच कुठल्याही परिणामांना तोंड द्यायची त्यांची मानसिक तयारी झालेली होती. त्यांचा स्वभाव तसा धाडसी होता. पण तीन वर्षे फरारी असलेल्या रोपीला जेव्हा इतक्या मोठ्या पोलीस अधिकायापुढे उभे केले जाते तेव्हा कितीही नाही म्हटले तरी मनावर तणाव हा येतोच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मोरेसाहेब अतिशय सुसंस्कृत निघाले. ते दिसायलाही अगदी बांधेसूद, लालबुंद आणि देखणे होते. त्यांनी रावसाहेबांना बसायला सांगितले आणि उत्कृष्ट इंग्रजीत त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. रावसाहेबांना तो अनुभव पोलीस खात्याशी अगदी विसंगत असाच वाटला. पुढे गप्पांमधून त्यांची जी पार्श्वभूमी उलगडली तीही खूप वेधक होती. ते स्वतः एका घरंदाज मराठा कुटुंबातले होते. ग्रामीण भागाविषयी त्यांना खूप आस्था दिसली. रावसाहेबांसारख्या तरुणांनी खूप शिक्षण घ्यावे आणि शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाल ताऱ्याची साथ... १८७