पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते; रावसाहेबांसमोर त्यांना पुन्हा एकदा प्रिन्सिपॉलांनी माफी मागायला लावली. आता रावसाहेबांची पाळी होती. पण त्यांचा निर्धार पक्का होता. ते नम्रतापूर्वक पण स्पष्टपणे म्हणाले, "सर, मी काही चूक केली आहे असं मला वाटत नाही. सरकारने फीवाढ केली. त्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. सरकारने लाठीमार- गोळीबार करून दडपशाही केली. त्याचा निषेध म्हणून आम्ही शाळा-कॉलेजेस बंद पाडली. यात आमचं काय चुकलं? सरकारचं कृत्य अमानुष नव्हतं का ? मी माफी मागायचं काहीच कारण नाही. " माफी मागणारे त्यांचे सगळे सहकारी अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत होते आणि मग नजर खालीही फिरवत होते. हिवाळेसर क्षणभर थांबले. मग विचारमग्न चेहऱ्याने रावसाहेबांजवळ आले. "शाब्बास !" म्हणत त्यांनी रावसाहेबांची पाठ थोपटली. "Our country needs young and brave people like you,' असं ते रावसाहेबांना म्हणाले व "उद्या परत मला भेट, " म्हणत त्यांनी आजची भेट संपल्याचे सूचित केले. }} दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी रावसाहेब साशंक मनाने पुन्हा एकदा हिवाळेसरांच्या ऑफिसात गेले. यावेळी रावसाहेब एकटेच होते. हिवाळेसर म्हणाले, “कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत तू भाग घेतोस हे समजून मला धक्काच बसला आहे. मिशनला हे समजल्यानंतर तू बाजूला राहशील, पण माझी मात्र खरडपट्टी निघेल. मिशन अशा बाबींच्या फार विरुद्ध आहे. तेव्हा तू वसतिगृहाची आणि कॉलेजची सगळी फी भरून दे, मेसचंही सगळं बिल भरून दे आणि वसतिगृह खाली कर. }} ही फेब्रुवारी १९४८मधली घटना. पुढच्याच महिन्यात मुंबई विद्यापीठाची इंटर आर्ट्सची परीक्षा होती. वसतिगृह सोडून राहणार कुठे, जेवणार कुठे हे सारे प्रश्न आ वासून समोर उभे आपली अडचण त्यांनी हिव समजावून सांगितली. म्हणाले, "सर, आता मला परीक्षेसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता केवळ एक-दीड महिन्यापुरती मला सवलत द्या. मागील पैसे मी कुठून भरणार? माझ्याकडे तर एक कपर्दिकही नाही. माझी परिस्थिती तुम्हांलाही ठाऊक आहे. तरी एवढी कृपा करा, ” एवढे बोलून अदबीने नमस्कार करत त्यांनी हात जोडले. " यावर जरा विचार करून हिवाळेसरांनी एक पर्याय सुचवला. "मग एक कर. माझी चूक झाली व मला आता पश्चात्ताप होतो आहे आणि यापुढे वसतिगृह व कॉलेजात असेपर्यंत मी चळवळीत पडणार नाही, असं तू मला लेखी दे. मी ते मिशनपुढे ठेवतो आणि तुझ्या सवलती चालू ठेवतो. पण त्याशिवाय आता मिशन अजुनी चालतोची वाट... १२६