पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतर सहकारी ; रावसाहेबांचे सहायक प्रा. शरद दुधाट आणि वाहनचालक कय्यूम सय्यद यांचा मी ऋणी आहे. ज्यांचा रयतशी थेट संबंध नाही अशाही अनेकांनी या लेखनासाठी साहाय्य केले. उदाहरणार्थ, सिन्नरचे श्रीकृष्ण भगत, नाशिकचे उद्योगपती देवकिसन सारडा, प्रा. अशोक सोनवणे, अॅडव्होकेट भगीरथ शिंदे, श्रीरामपुरातील रावसाहेबांचे शेजारी व प्रतिष्ठित व्यापारी सुमनभाई शहा, जर्मन हॉस्पिटलच्या सिस्टर मारिया, अॅडव्होकेट भागचंद चुडीलाल, संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव कानवडे, प्राचार्य केशवराव जाधव, कोपरगावचे डॉ. अजेय गर्जे, टाकळीभानचे बापुसाहेब बाळाजी पटारे, मुंबईस्थित मिशनरी डॉ. विजू अब्राहम इत्यादी. या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाचे अक्षरजुळणीचे (डीटीपीचे) काम ज्यांनी केले त्या ज्ञानेश्वर भोसले यांचा, मुद्रितशोधनातील सहकार्याबद्दल अंतर्नादच्या व्याकरण - सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांचा व देखण्या मुद्रणाबद्दल प्रकाश ऑफसेटचे राहुल वेलणकर व त्यांचे कुशल सहकारी यांचाही मी ऋणी आहे. पुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी घेतल्याबद्दल आणि इतरही अनेक बाबींत दिलेल्या तत्पर सहकार्याबद्दल प्राध्यापक बाबासाहेब शेंडगे, रावसाहेबांचे सचिव सुकदेव सुकळे व पुण्यातील फार्मसिस्ट व समाजकार्यकर्ते सचिन इटकर यांचेही विशेष आभार. पुस्तकासाठी माहिती गोळा करण्यासाठी प्रस्तुत लेखकाने श्रीरामपूर, कोपरगाव, पाडळी, टाकळीभान, सिन्नर, नाशिक, संगमनेर इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या व निदान सव्वाशे ते दीडशे जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चाही केली. प्रत्येकाचे नाव इथे नमूद करणे शक्य झाले नसले तरी त्या सर्वांचाही मी आभारी आहे. भाऊसाहेब थोरातांपासून पी. बी. कडू पाटलांपर्यंत, रूथबाई हिवाळेंपासून अरुण साधूंपर्यंत आणि सविता भावेंपासून मा. भि. करांपर्यंत कांनी या कालखंडातील व या परिसरातील घडामोडींविषयी लिहिलेल्या पुस्तकांचा मला घटनांची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी बराच उपयोग झाला. स्थलाभावी त्यांचीही विस्तृत यादी दिलेली नाही; पण त्यांच्याप्रतीही मी कृतज्ञ आहे. सरतेशेवटी एक उल्लेख मला कृतज्ञतापूर्वक करायलाच हवा. या लेखनात मी गर्क असताना अंतर्नाद मासिकाच्या कामाचा नेहमीपेक्षा खूप अधिक वाटा जिने विनातक्रार उचलला ती माझी पत्नी वर्षा हिचा. स्थलाभावी येथे केवळ काहींचा उल्लेख करता आला. ज्यांची नावे या ठिकाणी नोंदवायची राहून गेली असतील त्यांनी मला क्षमा करावी. या पुस्तकात काही मौलिक, सकस व वाचनीय असेल, तर त्याचे मोठे श्रेय उपरोक्त अजुनी चालतोची वाट... १२