पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" त्यांना कदाचित आली असावी. "काहीच नाही," रावसाहेबांनी खरे तेच सांगितले. " 'काल रात्री काय खाल्लं होतं ?" "काहीच नाही, " रावसाहेब उत्तरले. "बरं, काल सकाळी काय खाल्लं होतं?” "काहीच नाही," उत्तर. "म्हणजे काय? अरे हवेवर जगतोस काय?” भडकून डॉक्टरांनी विचारले. पेशंट खरे ते सांगत नाही आहे असे बहुधा डॉक्टरांना वाटले असावे. पुन्हा तेच आता मात्र रावसाहेबांना रडू आवरेना. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाह लागले. नंतर त्यांनी डॉक्टरांना सगळी कहाणी सांगितली. रावसाहेब म्हणतात, "वास्तविक रडणे किंवा तोंड केविलवाणे करणे, कोणीतरी माझी कीव करणे हे मला कधीच आवडत नसे. पण त्यावेळी मात्र मी स्वत:ला आवरू शकलो नाही. माझ्या उपासमारीच्या जिण्याचा जीवघेणा घाव माझ्या जिव्हारी लागला होता. इतका असहाय मी पूर्वी कधीच झालो नव्हतो." डॉक्टरांनी लगेच बाहेर थांबलेल्या ओलकरांना आत बोलावले. "याला आजार वगैरे काहीच झालेला नाही. This fellow is dying of starvation, " असे म्हणत ते ओलकरांनाच रागावू लागले. अर्थात यात बिचाऱ्या ओलकरांचा काहीच दोष नव्हता; रावसाहेबांनीच त्यांना सत्य परिस्थितीचा काही थांगपत्ता लागू दिला नव्हता. "मला का नाही सांगितलीस तुझी अडचण ?” ओलकरांनी रावसाहेबांना आपुलकीने दटावले. डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या, पण 'जेवल्यानंतरच घ्या' असेही सांगितले. दवाखान्यातून ओलकर रावसाहेबांना थेट आपल्या बंगल्यावरच घेऊन गेले. त्यांना तिथे पोटभर जेवायला घातले. जेवण साधेच होते. वरण, भात, पोळी, भाजी, आमटी असे. पण रावसाहेबांना ते अमृताहून गोड लागले. बारा-चौदा दिवसांनंतर प्रथमच ते असे सात्त्विक काही जेवले होते. गरिबी रावसाहेबांनी खूप पाहिली होती, पण पासमारीचा असा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. आता जेवल्यानंतर त्यांना बरीच हुषारी वाटली. त्यांनी गोळ्या घेतल्या, थोडी विश्रांती घेतली आणि मग पुन्हा ते ओलकरांबरोबर युनियन ऑफिसात आले. तिथे पोचताच अण्णाभाऊंचे पत्र त्यांच्या हाती पडले. सोबत अण्णाभाऊंनी दत्ता देशमुख यांनी लिहिलेले एक शिफारसपत्रही जोडले होते. देशमुखांचे हे पत्र त्यांचे स्नेही हिंदुराव पारखे यांना लिहिलेले होते व त्यात 'रावसाहेबांना बोर्डिंगमध्ये प्रवेश द्यावा असे कळवले होते. पारखे व कॉम्रेड आनंदराव चव्हाण हे दोघे बोर्डिंगचे व्यवस्थापन पाहत. आपल्या अडचणींबद्दल आणि विशेषत: उपासमारीबद्दल रावसाहेबांनी अण्णाभाऊंना आठ-दहा दिवसांपूर्वीच एक विस्तृत पत्र लिहिले होते व त्याला प्रतिसाद म्हणून अण्णाभाऊंनी तातडीने ही तजवीज केली होती. त्यांची अजुनी चालतोची वाट... ११६