पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महत्त्वाचे होते. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज ही एक भव्य वास्तू आहे; १८८० साली स्थापन झालेली व ७५ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात वसलेली. जुन्या राजवाड्याचाच तो एक भाग आहे. राजवाड्याच्या वेशीसारख्या दिसणाऱ्या मोठ्या कमानींच्यावर प्रिन्सिपॉलांचे ऑफिस होते. प्रिन्सिपॉल अगदी सुटाबुटात होते. खूप प्रसन्न व्यक्तिमत्त्व. भरदार शरीरयष्टी, गोलाकार भव्य चेहरा, मोठे कपाळ. रावसाहेबांशी ते खूप मार्दवपूर्ण व जिव्हाळ्याने बोलले. एफ. वाय. आर्ट्सचा प्रवेशअर्ज त्यांनी भरून घेतला व संबंधित माणसाकडे तो देऊन पुढील अटींची पूर्तता करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा व रावसाहेबांचा जो संवाद झाला तो आजही रावसाहेबांच्या स्मरणात आहे. रावसाहेब : "सर! मी फी भरू शकत नाही." प्रिन्सिपॉल : "अरे बाळ, आता फ्रीशिप सगळ्या संपल्या आहेत. तुला उशीर झाला. " रावसाहेब : "सर, पण मला फी भरता येणारच नाही.' })} प्रिन्सिपॉल : “मग असं कर, तीन चतुर्थांश फी भर, एक चतुर्थांश फ्रीशिप देतो." रावसाहेब : "सर, पण तेवढीही फी मला नाही भरता येणार." प्रिन्सिपॉल : "बरं मग, अर्धी नादारी देतो, अर्धी फी भर. ' रावसाहेब : "सर, तेही शक्य नाही हो !" }} प्रिन्सिपॉल : “ठीक आहे. एक चतुर्थांश भर, तीन चतुर्थांश माफ करतो. " रावसाहेब : "सर, माझी स्थिती खूपच गरिबीची आहे. माझ्याकडे फी भरण्यासाठी अजिबातच पैसे नाहीत. " प्रिन्सिपॉल : " अरे बाळा, तू इतक्या लांबून नाशिक जिल्ह्यातून इकडे आलास, हणजे तू गरिबीमुळेच आला असणार हे मलाही समजतं. पण तू उशीर केलास म्हणून माझी अडचण झाली आहे. मी सगळ्या फ्रीशिप देऊन टाकल्या आहेत. बरं, आता प्रवेश फी भरतोस की नाही? तेवढी तरी भर. आणि तुझे इथले स्थानिक पालक कोण ? का तेही काम मलाच करावं लागेल ?” • रावसाहेब : "सर, प्रवेश फी तेवढी भरतो. आणि खरंच मला इथे स्थानिक पालक कोणीच नाही. तुम्हीच माझ्या पालकांसारखे आहात, सर !” हा सगळा संवाद इतक्या विस्ताराने देण्यामागचे कारण म्हणजे त्यात प्रिन्सिपॉलांचा जिव्हाळा, कळकळ, समोरच्या मुलाच्या गरिबीची जाणीव आणि त्याला शिक्षण घेता यावे म्हणून नियम जास्तीत जास्त वाकवण्यातला लवचीकपणा हे सगळे गुण अजुनी चालतोची वाट... ११४