पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोय केली. फर्गसन कॉलेजजवळ गणेशवाडीत कम्युनिस्ट पक्षाचा एक कम्यून ( एकत्र राहण्याचे स्थान ) होता. पुण्यात एल. आर. गोखले नावाचे एक बड़े वकील स्वतः कम्युनिस्ट होते. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षाला दान दिलेल्या त्या प्रशस्त बंगल्यात हा कम्यून चालवला जाई. इतका मोठा, अगदी मोक्याच्या आणि महागड्या जागी असलेला हा बंगला गोखले कुटुंबीयांनी पक्षासाठी दान करावा यात प्रचंड असे औदार्य होते; पण पक्षासाठी सर्वस्व दान करायची आणि स्वतः अगदी साधेपणाने राहायची त्याकाळी, विशेषत: कम्युनिस्टांमध्ये, एक परंपराच होती. पक्षाचे एक ज्येष्ठ नेते कॉ. नम्बुद्रीपाद हे केरळमधल्या एका मोठ्या जमीनदार कुटुंबातले होते, पण कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली सगळी मालमत्ता अशीच पक्षाला देऊन टाकली होती. कॉम्रेड गोखलेंच्या सगळ्या कुटुंबानेच कम्युनिस्ट चळवळीला वाहून घेतले होते. गोदावरी व सुशीला या त्यांच्या कन्या. एकीचे लग्न शामराव परुळेकरांशी तर दुसरीचे मुंबईचे बॅ. रजनी पटेल यांच्याशी झाले होते. ही सर्वच मंडळी कॉम्रेड होती. अण्णाभाऊंमुळे रावसाहेबांची पुण्यातल्या कम्यूनमध्ये झोपायची सोय झाली. त्यांच्याबरोबर धर्मा पोखरकरही आले होते. एक-दीड मैलावरील नूतन मराठी विद्यालय या नामांकित शाळेत दोघांनाही प्रवेश मिळाला. शाळेपासून दोन- अडीच मैलांवरील शुक्रवार पेठेतल्या मराठा बोर्डिंगमध्ये जेवणाची मोफत सोयही झाली. पण रावसाहेबांचा जीव पुण्यात रमेना. नू.म. वि. मधल्या शिक्षणाचा दर्जा संगमनेरच्या मानाने बराच उच्च होता. वर्गातला अभ्यासही बराच पुढे गेला होता. रावसाहेबांना तो अभ्यास जड़ जाऊ लागला. शिवाय शिंदे बोर्डिंगच्या आठवणी एकसारख्या मनात येत; कधी एकदा तिकडे परततो असे होऊन जाई. अण्णाभाऊंची पुण्यातच राहून मॅट्रिक व्हावे अशी होती; पुढील शिक्षणाचीही सोय पुण्याला उत्तम होती. पण रावसाहेबांचा जीव मात्र शिंदे बोर्डिंगमध्येच अडकलेला होता. अलीकडे त्यांना अभ्यासाचे फारसे महत्त्व वाटेनासे झाले होते. सुदैवाने लौकरच संगमनेरमधली प्लेगची साथ संपल्याची बातमी आली. रावसाहेबांनी पुन्हा पेटिट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. इतर मुलेही एकेक करत झपाट्याने परतली व शिंदे बोर्डिंग पुन्हा पूर्ववत सुरू झाले. इच्छा पण अभ्यासावरून मात्र रावसाहेबांचे लक्ष उडाले ते उडालेच. पूर्वपरीक्षेत (प्रिलिममध्ये) त्यांना खूपच कमी मार्क पडले. त्यावेळी मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठ घेई. त्यांचे परीक्षेसाठीचे सेंटर नाशिक होते. परीक्षेनंतर सुट्टीसाठी ते पाडळीला घरी गेले. आता पुढच्या कॉलेजशिक्षणाचा विचार करणे गरजेचे होते. अजुनी चालतोची वाट... १००