पान:अकबर १९०८.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
खंड ५ वें.

 येथून वहात वहात प्रयागच्या किल्लयाखालून जात आहे आणि तेथेंच • माझी प्रिया निवास करीत आहे. याप्रमाणें इरावतीचें स्मरण होतांच त्यानें आंत जाऊन तिची तसबीर काढून आणिली आणि तो एकसारखा तिज- कडे प्रेमपूर्ण दृष्टीनें पाहूं लागला. तेव्हां त्याला ती इरावतीची छबी अधिकाधिक प्रिय वाटू लागली. परंतु, त्याने जेव्हां आपली दृष्टि उद्यानाकडे फेंकली तेव्हां सौंदर्यवल्ली रझिया हिचा सुखचंद्रही त्याचे दृष्टी- पुढे उभा राहिला. तेव्हां तो आपल्याशींच विचार करूं लागला कीं, हिचा आपला काय संबंध आहे; तथापि कोणत्याही वस्तूचें निष्पाप दृष्टीने सौंदर्य पाहण्यास काय हरकत आहे ? तेणेंकरून माझें इरावती- • वरील प्रेम थोडेंच कमी व्हावयाचें आहे. अशा तन्हेच्या विचारांत निमग्न • असतां सिद्धरामास निद्रादेवीनें माळ घातल्यामुळे तो आपल्या शयनमंदि- रांत जाऊन निद्रावश झाला.
 दुसरे दिवशीं सकाळींच पर्विजनें दारावर येऊन आवाज दिला कीं, वत्स, तुझे यजमान उठले कीं नाहीं ? "
 • वत्स - आपण या स्थळीं बसावें. यजमान प्रातः स्नान करून संध्या- बंदनाला बसले आहेत. ते बहुधा लवकरच बाहेर येतील.
 नित्य नियमाप्रमाणे सिद्धराम आपले संध्योपासनादि प्रातविधि आटो- पून वस्त्रे परिधान करून आपल्या बैठकीच्या दिवाणखान्यांत आला आणि तेथे त्याने पर्विजला घेऊन येण्याविषयीं सेवकास आज्ञा केली. आंत येतांच पर्विजनें सिद्धरामाच्या आदरसत्काराचा स्वीकार करून त्यास झटलें, ' कसे काय ? सेनेचा अधिकार तर आपणांला मिळालाच, तेव्हां • बहुधा आपणांला आतां कामावर जावयाचें असेल.
 सिद्धराम — होय, अधिकार तर मिळालाच. परंतु, तूर्त दोन दिवस कामाच्या संबंधानें आह्मांस सुटी मिळाली आहे.
 पर्विज्ञ -- तर मग फार चांगलें आहे. आज आपण कोठें तरी सहळ करावयास जाऊं.
 सिद्धराम -- कार चांगलें, जशी आपली इच्छा. आज कोणीकडे चल- याचा विचार आहे ?