पान:अकबर १९०८.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

८१

गोष्ट जितकी गुप्त राहील तितकें चांगलें. याशिवाय आणखीही एकदोन वेळ आपणांला येथवर येण्याचें श्रम घ्यावे लागतील.
 सिद्धराम—श्रम कशाचे ? परंतु, अद्यापपर्यंत मला तुमचें नांव वगैरे कांहींच कळलें नाहीं. माझें विचारणें जर अप्रशस्त वाटत नसेल तर आपण आपला विशेष परिचय द्याल.,
 तरुण स्त्री झणाली, ' ज्याअर्थी आपण मजवर इतका अनुग्रह केलांत त्याअर्थी माझ्या संबंधाची कोणतीही गोष्ट आपणांपासून लपवून ठेवण्याचें मला कांहींच कारण दिसत नाहीं. माझें नांव रझिया आहे. माझा पिता मूळचा अर्मिनिया प्रांतांतील रहिवासी असून तो येथें व्यापाराच्या निमि- तानें आला असतां मी त्याजबरोबर होतें. पुढें त्यानें माझा विवाह येथी- लच एका सौदागिराशीं करून दिला होता. लग्नांतच माझ्या पतीचें वय मर्यादेहून अधिक होतें. लग्नानंतर कांहीं दिवसांनीं माझे पति कांहीं कामानिमित्त फारस देशाकडे निघून गेले; त्यावर त्यांचा आजपर्यंत कांहींच पत्ता नाहीं. ते गेल्यापासून मी या एकांत उपवनांत आपण पहात आहांत त्या स्थितींत नेहमीं पडून असतें. याप्रमाणें माझी हकिकत आहे. जरी कदाचित् आपली आणि माझी पुन्हा भेट न झाली तरी एवढ्याव वरू आपली कोणाशी भेट झाली होती हें आपल्या ध्यानांत राहील.
 सिद्धराम — छे, छे, पुन्हां भेट नाहीं असें कसें होईल ? निदान आपल्या सखीचा परत आलेला निरोप सांगण्याकरितां तरी मला तुमच्या- कडे यावे लागेल.
 रझिया - ही तर आपली मोठीच कृपा म्हणावयाची. पत्रोत्तर आल्या- वर एकादे दिवशीं संध्याकाळी आपण जराशी तसदी घ्या. माझी दासी आपणाला भेटेलच आणि जेव्हां आपणाला इकडे यावयाचें असेल तेव्हां तिच्या द्वारें मला पूर्वी सूचना पाठविण्याचें करा. यानंतर कुमार सिद्धराम तें पत्र घेऊन तेथून निघाला आणि लौक- रच आपल्या राहण्याच्या जागीं येऊन पोहोंचला. घरी आल्यावर त्या ऐन मध्यरात्रीच्या समयीं कांहीं काळपर्यंत तो आपल्या बंगल्याचे पडवींत हळू हळू पावले टाकीत तेथून सन्मुख असलेल्या यमुनानदीची शोभा पहात राहिला. त्यावेळीं त्याचे मनांत विचार आला कीं, हेंच यमुनाजल