पान:अकबर १९०८.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

८३

 पर्विज -- ठीक आहे. तर मग आज * फत्तेपूर शिक्रीकडे जाऊं. त्याठि काणीं खुद्द बादशहा सलामत हे रहात असतात आणि जे वैदेशिक लोक या नगरांत येतात, ते एकवार तें स्थान पाहिल्याशिवाय जातः नाहींत..
 सिद्धराम —— मजकडून तयारी आहे. परंतु, आपण किंचित् कालपर्यंत येथेंच बसावें. आज आमचे गुरुजी काश्मीरास जावयाचे असून ते अगदीं. निघण्याच्याच बेतांत असतील, करितां मी त्यांना भेटून त्यांची रवा-- नगी करून येतो..
 पर्विज - ठीक आहे..
 पर्विजला तेथें दिवाणखान्यांत बसवून सिद्धराम कुल्लुकाकडे आला.. तो अगदीं निघण्याच्या तयारीतच होता. सिद्धरामानें त्या तरुण स्त्रीनें दिलेलें पत्र त्याचें स्वाधीन केलें. तदनंतर कुल्लुक यानें सिद्धरामास दरबारीं वर्तनासंबंधानें थोडासा उपदेश केल्यावर त्यास प्रेमपूर्वक आशीर्वाद देऊन तो वाट चालू लागला. कुल्लुक गेल्यावर सिद्ध- राम आणि पर्विज आपआपल्या अश्वांवर आरूढ होऊन फत्तेपुरा-- कडे जावयास निघाले. फत्तेपुराकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूंस सुंदर प्रछायवृक्षराजींनी सुशोभित असून, त्यावरून जाणारास भोंवताल-- च्या क्षेत्रांचीही मनोहर शोभा दृष्टीस पडत असे. ती सर्व शोभा अवलो-- कन करीत करीत आमचे पार्थिक शिक्रीकडे चालले होते..
 मार्गांतून जात असतां पर्विज सिद्धरामास ह्मणाला "पाहिलेंतना सिद्ध-- रामजी, बादशहा सलामत यांनी अशाचप्रकारें हरएक मार्गावर वृक्षराजी. उभ्या केल्या आहेत. पूर्वी जेथें एखादें हिरवें पानही दृष्टीस पडत. नस-- ल्यामुळे विचारें पांथस्थ सूर्यतापानें व्याकुळ होऊन जात असत. तेथें. सांप्रत अनेकत-हेच्या सुंदर वृक्षराजी उठल्या असून त्या प्रवासीजनांच्या चित्तास आल्हाद देत आहेत. केवढें परोपकाराचे कृत्य हैं ?

  • हैं स्थान आग्र्यापासून सहा कोसांवर आहे. येथे असलेली एक मशीद फारच अपूर्व आहे. इ. स. १५७० पासून तो आपल्या अवसाना कालापर्यंत शाहनशहा अकबर तेथेंच रहात असें..