पान:अकबर १९०८.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
खंड ५ वें.

 दुसऱ्याच एका व्यक्तीचें नांव लिहिलेलें आहे. कदाचित् या व्यक्तीला आपण जाणतही असाल. "
 सिद्धराम -- होय, आम्हीं दोघे प्रायः बरोबरच शिकार खेळत असूं. तरुण स्त्री म्हाली, ' झालें तर, आपले गुरुजी जर त्या व्यक्तीला हें पत्र नेऊन देतील तर ते त्या माझ्या सखीला पोचतें करील. यापासून विशेष गोष्ट ही होईल कीं, आपल्या गुरुजीनाही माझी सखी कोण हें कळणार नाहीं. बनेल तेथपर्यंत ही गोष्ट गुप्तच ठेवणें उचित आहे.' ती किंचित् थांबून पुन्हां ह्मणाली, ' मला माझ्या सखीच्या वियोगाचे दुःख तर सहन करावें लागतच आहे. परंतु, ती मात्र मोठी भाग्याची म्हणावयाची; कां कीं, तिला आपल्या नंदनवनोपम भूप्रदेशाचें सुख भोगावयास सांपडत आहे. त्या आपल्या देशाचें वर्णन मीं पुष्कळसें ग्रंथांतरींही वाचले असून, प्रायः लोकमुखानेंही त्याची स्तुति वारंवार कानी पडते. आतां तें वर्णन यथार्थ आहे किंवा केवळ कवींची कपोल कल्पना मात्र आहे,  हें आपण कृपा करून मला सांगा.
 सिद्धराम -- केव्हांही अत्युक्ति न करण्याविषयीं माझ्या गुरुजींची मला आज्ञा आहे. म्हणून मी खरेंच सांगतों कीं, आमचा देश म्हणजे खरोखर या भूलोकची अमरावतीच म्हटली पाहिजे. तुमचें हें शहर जरी रमणीय आहे, येथील महालांची आणि उपवनांची शोभा चित्ताला हरण करणारी आहे तथापि, ती सृष्टिशोभा, तीं गिरि शिखरें, ती वनश्री आणि तरायांची सहज छबी फक्त आमच्याच प्रदेशाच्या वाट्यांस आली आहे ! तेथील अनुपम सौंदर्याचें तुह्मां लोकांना नुसतें अनुमान देखील व्हावयाचें नाहीं. जो जो सिद्धराम त्या सुंदरीपाशीं आपल्या जन्मभूमीचें वर्णन करी तों तों स्वदेशानुरागानें त्याचें हृदय अत्यंत प्रफुल्लित होत जाई. तो शेवटी म्हणाला, आह्मांला जाण्याची आज्ञा या. कां कीं, रात्र अधिक अधिक होत चालली. '
 आतां तरुण स्त्री ह्मणाली, ' मी आपल्या मुखानें आपणांला जा असें कसें ह्मणूं ? आतां प्रार्थना इतकींच कीं, आपल्या येथें येण्याचा वृत्तांत कोणा- लाही न कळावा. नाहींतर, माझ्या सखीचें नुकसान होईल; करितां ही