पान:अकबर १९०८.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
• अकबर.

७२

सभ्यपणाचें नाहीं आणि पुढेमागे आपण माझें खरेंच स्मरण केल्याचें जर कळते तर माझी उत्कंठा मात्र अधिक प्रबल होती.
 त्यावर ती तरुण स्त्री ह्मणाली, “ परंतु, आपण माझ्या विनंतीस मान दिलात ही आपली मजवर फारच मोठी कृपा झाली. आपणाला हे श्रम देण्यांत कांही मला माझें स्वतःचें हित साधावयाचें नाहीं तर मला माझ्या हृतप्रेमभगिनीसखीचें हित साधावयाचें आहे. कांहीं दिवसांपूर्वी निरुपाया- स्तव तिला येथून पळून जाऊन आपला काश्मीर देश पहावा लागला. त्याचें कारण येथील कित्येक दुराचारी जबरदस्त अधिकाऱ्यांनीं तिला आपल्या राज्यांत फसविण्याचा यत्न केला होता. सांप्रत मला तिज- कडे फारच जरूरीचा निरोप पाठवावयाचा आहे. आजपर्यंत ज्याच्यावर मला विश्वासानें हैं काम सोंपवितां यईल असा कोणीहि विश्वासपात्र मनुष्य मिळाला नाहीं. आज मला अकस्मात् खबर लागली ( कशी तें सांगण्याची कांहीं अवश्यकता नाहीं ) कीं आपण आपले प्राचीन गुरु कुल्लुक यांचेसह येथें आला असून कुल्लुकगुरु वर परवाचेच दिवशी पुन्हां काश्मीरास परत जावयाचे आहेत. तेव्हां मी मनांत विचार केला कीं, त्यांच्यापेक्षां विश्वासपात्र मनुष्य मला दुसरा कोण मिळणार ? करितां आतीं अपणांला मी येवढीच प्रार्थना करितें कीं, आपल्या शब्दानें कुल्लुकगुरु माझें पत्र घेऊन जातील असें करा. मी आपली फार फार आभारी होईन. "
 हें तिचें भाषण ऐकून सिद्धरामाचें चित्त बरेंच स्थिर झालें. कांकी केवळ एक साधारण पत्र पोंचविण्याचेंच काम असून, त्यांत आपली कांहींच हानी दिसून येत नाहीं आणि त्यांत आपला विशेषसा संबंधही नाहीं, अशी त्याची पक्की खात्री झाली. तेव्हां त्यानें तिच्या इच्छेप्रमाणें तिचें पत्र गुरुजींकडून तिच्या सखीस पोहोंचतें करविण्याचें तिला आश्वासन दिलें.
 तरुण स्त्रीनें इशारा करितांच, त्या दासीनें आंत जाऊन एक रेशमी दोऱ्याने बांधून लाखेनें मोहोरबंद केलेला लखोटा आणिला आणि तो त्या स्त्रींचें हातीं दिल्यावर ती तेथून चालती झाली. दासी निघून गेल्यावर तरुण स्त्री ह्मणाली, या लखोट्यावर माझ्या सखीचा पत्ता नसून यावर