पान:अकबर १९०८.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
खंड ५ वें.

उद्यानाच्या चहूं बाजूस असलेल्या भिंती फारच उंच उंच होत्या. हीं दोघें जेव्हां तेथें पोंचलीं तेव्हां त्याचें फाटक बंद होतें. मग दासीनें हळूच त्याची दिंडी उघडून सिद्धरामास आंत नेलें आणि पुन्हां दिंडीचें दार घट्ट दाबून बसविलें. आंत गेल्यावर दोहों बाजूंस सुंदर सुरूचे वृक्ष लागले आहेत, अशा फरसबंदी मार्गावरून जातां जातां कुमार सिद्धराम एका चवथयाजवळ जाऊन पोहोंचला. त्याठिकाणी अनेक फुलझाडे आणि फळझाडें यांच्या मधून सुंदर कारंजी उडत होती. चवथऱ्याचे पाठीमागचे बाजूस एक सुंदर आणि स्वच्छ असे दोन अंगांनी पुष्पलता वेष्टित उद्यान- गृह होतें. त्याच्या प्रशस्त संगमरवरी पायऱ्यांवरून दासी सिद्धरामास वरच्या बारद्वारी बंगल्यांत घेऊन गेली. त्याठिकाणी चहूंकडून येणारा उद्यानगत अतएव परम सुगंधित वायु चित्तास प्रफुल्लित करीत होता. तेथें सिद्धरामास बसवून जवळच्या दाराचा पडदा दूर सारून दासी आंत गेली. तेथें एक यवन जातींची अत्यंत सुकुमार सुंदरी बाला बहुमूल्य वस्त्रभूषणांनी मंडित असलेली मंचकावर निजली होती. दासीच्या मुखानें कुमाराच्या आग- मनाचे वर्तमान कळतांच ती चट्कन् उठून उभी राहिली आणि मंदमंद पाउलें टाकीत तो पडदा दूर सारून मेवनिर्गत सौदामिनीसारखी बाहेर आली. तिचें अपूर्व सौंदर्य अवलोकन करून कुमार अगदीं चकित झाला. तें चंद्रासारखें स्वच्छ मुख, ते कमलपत्राकार काळेभोर डोळे, पक चित्रकलासमान ओष्ठ, ते अनुरागयुक्त कपोल आणि धनुष्याकार भुवया हीं सर्व कोणाचेही चित्त मोहित करणारी होतीं. तिच्या गौरवर्ण मनग- टांतील रत्नजडित कंकणांचा छनत्कार आणि पायांतील पैंजणांचा झण- त्कार तर हृदय भेदून पार होत होता.

 त्या तरुण स्त्रीनें येतांच कुमाराकडे अत्यंत स्नेहमय दृष्टीनें अवलोकन करून त्यास मृदुमधुर शब्दांनीं ह्यटलें, “ या, या, माझ्या करितां आप- णांला फार कष्ट झालें. परंतु, आपण मजवर इतकी कृपा केली याबद्दल मी आपले निरंतर आभार मानीन. कदाचित् येवढ्या रात्रीं आपणांला येथें येण्याचें श्रम दिले ही गोष्ट आपणांस अनुचित वाटेल. परंतु, आपण जेव्हां याचें कारण ऐकाल, तेव्हां आपणांला माझें यथार्थ करणें वाटेल. सिद्धराम - सहसा कोणाच्याही निमंत्रणाचा स्वीकार न करणें कांहीं