पान:अकबर १९०८.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

७७

इतकें भाषण झाल्यावर बादशहानें कुल्लुकास प्रणाम केला आणि कुल्लुकही त्यास आशीर्वाद देऊन तेथून निघाला. तो गेल्यावर बादशहा आपल्याशींच म्हणाला, ' खरोखर या गृहस्थावर मात्र मी विश्वास ठेवूं शकतों. याचें अंत:करण केवळ निष्कपट आहे. या गृहस्थाचें कुल, धर्म आणि याची पदवी हीं अगदी भिन्न असतांही हा मजवर इतका स्नेह आणि विश्वास ठेवितो, हें माझें त्याच्याशी असलेल्या उचित वर्तनाचेंच फळ आहे. ' वाचकहो, बादशहाचेंच ह्मणणें सर्वथा खरें होतें. कांकीं, कित्येक मोठमोठ उच्च पदस्थ अधिकारी यांचा बादशहाशी अत्यंत निकट संबंध असतांही त्यांचे संबंधानेंही त्याचें अंतःकरण कुल्लुकाइतकें निर्मळ नव्हतें.

खंड ५ वें
नवीन आणि जुना परिचय.

त्याच दिवशी रात्री ठरल्याप्रमाणे नेमलेल्या वेळीं सिद्धराम त्या मशीदीजवळ जाऊन पोहोंचला आणि पहातो तों ती दासी त्याठिकाणीं त्याचीच वाट पहात उभी अस लेली त्याचे दृष्टीस पडली. सिद्धरामास पाहतांच तिनें त्याला आपल्या पाठीमागून येण्याचा संकेत केला आणि निरनिराळ्या आडवाटांनीं ती त्यास एका उद्यानासमीप घेऊन गेली. त्या