पान:अकबर १९०८.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
खंड ४ थें.

 थोडया वेळांपूर्वी माझी आणि आपल्या शिष्याची भेट होऊन त्याजबरोबर माझें थोडेसे संभाषणही झालें.

कुल्लुकनें आश्वर्ययुक्त होऊन झटलें, आपल्या समोर कोणीं आणिलें ? ”
 सिद्धरामाबरोबर ? त्याला बादशहा -- कोणीही नाहीं. अकस्मात् त्याची माझी बगीच्यांत गांठ पडली आणि अनुमानानें त्याला ओळखून मी त्याच्याशीं संभाषण करून बऱ्याच गोष्टींची विचारपूस करून घेतली. आपल्याला माहीत आहेच कीं, मजला अशा गुप्त रीतीनें संभाषण करणेंच प्रायः आवडतें. कुल्लुक तर काय आपण बादशहा सलामत यांजबरोबर संभाषण करीत आहों ही गोष्ट सिद्धरामाच्या लक्षांत आली नाहीं ?
 बादशहा – नाहीं, त्याला या गोष्टीचा मागमूस देखील लागला नाहीं. आपण मात्र त्याला इतक्यांतच या गोष्टीची ओळख देऊं नका. मीच एका दिवशी स्वतः त्याला पाचारण करून या गोष्टीची ओळख देईन. कदाचित त्याचे संबंधानें माझें मत काय झालें आहे हें जाणण्याची आप- णाला उत्कट इच्छा झाली असेल. तरी तो आपला शिष्य मोठा योग्य आणि सन्मान्य पुरुष असून माझ्या विश्वासासही तो पात्र आहे, ही गोष्ट आपणांस कळविणें मला इष्ट वाटतें. परंतु, कांहीं थोडासा गैरसावधपणा त्याचे ठिकाणी मला दिसून-कुल्लुक हंसून ह्मणाला, “छे, आपण कोणाबरोबर बोलत आहों हैं जर त्याला कळते तर तशाप्रकारचा गैरसावधपणा त्याचे ठिकाणीं आप- णांस दिसून आला नसता. "
 बादशहा -- परंतु, त्यासंबंधानें आपण कांहीं चिंता करूं नका. मी जेव्हां त्याचा गैरसावधपणा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, तेव्हां त्यानें - आपला दोष अशा खुविदार रीतीनें पदरांत घेतला कीं, तेणेकरून माझें चित्त खरोखरच अत्यंत प्रसन्न होऊन गेलें. एवढ्यांतच आपण लक्षांत आणा कीं, ज्याने पहिल्याच भेटींत मला इतकें रिझविलें, तो सुयोग्य पुरुषच असला पाहिजे. आतां त्यानें इतकेंच केलें पाहिजे कीं, ही माझी प्रसन्नता जेणेंकरून कायम राहील असें आपलें वर्तन ठेवावें.कुल्लुक -- जशी श्रीमंतांची आज्ञा.