पान:अकबर १९०८.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

७५

 आहे आणि मी तुझासही सांगुन ठेवितों कीं, तुमच्याने झाल्यास तुझी माझे श्रम वाचवण्याचा प्रयत्न करा. ह्नणजे मी कधीही तुमच्या काश्मीर-विषयक राजकारणांत हात घालणार नाहीं.

 कुल्लुक——–आपल्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला जो. किंचित् क्रोधाचा आवेश आला त्याचें कारण असें कीं, अगोदरच माझे: चित्तांत त्या विद्रोही लोकाबद्दल खेद वागत असून आपलें चढाईचें. भाषण तो खेद वाढविण्यास अधिकच कारणीभूत झाले. परंतु, वास्तविक पहातां प्रस्तुतची परिस्थिती आपणासारख्याचे मनांत भय उत्पन्न कर - णारी आहे खरी. असें जरी आहे तरी विश्वासघातकतेचें बीज आमच्या काश्मीरांतच तेवढें रुजतें आणि अन्यस्थळीं नाहीं अशी आपली. समजूत आहे कीं काय ? ही गोष्ट असंभवनीय समजूं नका कीं, आपल्याच. दरबारांतील आणि आपल्या स्वजातियापैकी कित्येकच लोक आपल्या. आणि आमच्या विरुद्ध खटपटी करण्यांत गुंतलेले आहेत. बादशहा -- तें कसें काय ? या आपल्या भाषणाचा. अभिप्राय. माझ्या लक्षांत आला नाहीं..
 कुल्लुक --- मी. जरी हा विषय आपणापुढे स्पष्टपणे बोलत आहे,, तथापि मलाही कित्येक गोष्टींविषयीं बराच संदेह आहे. आपले पुत्र शहा- जादा सेलिम-. बादशहानें विचारिलें, “ काय ह्मणतां सेलिमही त्यांत आहे ! ""
 कुल्लुक - मी. खात्रीपूर्वक असे आपणांला कांहींच सांगू शकत नाहीं.. परंतु, कित्येक लक्षणांवरून मला श्रीमंतांना सावध करून देणे उचितः वाटलें.. या गोष्टींत. जर कांहीं तथ्य नसेल तर उत्तमच आहे.. नाहीतर आपणांकडून सावधान आणि सतर्क राहण्यांत तरी काय हानी आहे ? बादशहा – सावधान्दः तर मी नेहमीच आहे आणि पुढेही राहीन... सांप्रत सर्वच गोष्टी अनुमान आणि तर्क यांवर अवलंबून आहेत.. अतएवः कोणतेही काम पूर्ण विचारावांचून करणे योग्य नव्हे.. आपण आतां जी. गोष्ट मला कळविलीत तिचा मी बारकाईनें शोध करीन आणि पुन्हां आपली भेट: झाल्यावर त्यासंबंधानें यथोचित बंदोबस्त करण्याचा आपण विचार करूं. अस्तु. आपणांला एक आनंदकारक वर्तमान सांगावयाचें तसेंच राहिलें. आतांच