पान:अकबर १९०८.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४

खंड ४ थें.

 'भरीस घालून त्यांची उठावणी करणारा दुसरी कोणीतरी असला पाहिजे - यांत तर संदेह नाहीच; पण हा भर देणारा कोण असावा याचा मला • कांहींच शोध लागत नाहीं.
 बादशहा – कांहींही असो. तो अकारण कलह करीत असो अथवा कोणाच्या चिथावणीनें भरी भरलेला असो. तीच पूर्वीची गोष्ट पुन्हां उप- स्थित होऊं पहात आहे खरी. आणि जर त्याचा वेळींच प्रतिबंध केला - गेला नाहीं तर परिणाम अत्यंत भयंकर होण्याचा संभव आहे. पूर्वीप्रमा- णेंच निरनिराळ्या जमावांचे लोक आपआपलीं शस्त्रें सांवरतील आणि अपसांतील वितुष्टांनी देशाचा सत्यानाश करतील. चहूंकडून या उपद्व्यापी • लोकांचीं सैन्ये उभी राहिल्यावर फक्त काश्मीर देशानेच त्यांची तृष्णा न संपतां ते आपल्या उत्पातांनी माझ्या प्रजेलाही पीडा देण्यास आरंभ कर- तील. याकरितां मी स्पष्टपणे सांगून ठेवितों कीं, ती गोष्ट मात्र मला सहन व्हावयाची नाहीं आणि मला प्रसंगोपात आपल्या प्रजेच्या रक्षणाकरितां काश्मीरावरही चढाई करून येणें भाग पडेल. लुटारु लोकांची गय करून आपल्या प्रजेला त्रास पोचूं देण्यांत काय लाभ आहे ? अतएव त्यांचीं - पाळें सुळें खणून टाकणेंच सर्वथा उचित आहे.
 यद्यपि गुरुकुल्लुक याचें बादशहावर अत्यंत प्रेम असून तो त्यास • मोठाच मान देत असे; तथापि त्याच्या या वरील अहंकारयुक्त आणि स्वदेशविरोधी भाषणानें त्याचा अंतस्थ क्रोधाग्नी भडकून उठला आणि जरी त्यानें कांहीं उत्तर दिलें नाहीं तरी त्याचा तो क्रोध बादशहास - गोचर झाल्यावांचून राहिला नाहीं. त्याच्या अंतस्थ कीधानें त्याचें नेत्र लाल झाले आणि ओठ फुरफुरूं लागले.
 कुल्लक गुरूची ती अवस्था पाहून बादशहा ह्मणाला, 'मित्र महाशय, क्षमा करा. माझ्या भाषणानें आपण इतकें क्षुब्ध होऊं नका. आपणांला पूर्णपणे विदित असू द्या की, माझ्या भाषणाचा रोख आपल्यासारखें सज्जन अथवा प्रस्तुतचे आपलें महाराज किंवा त्यांचे मंत्री यांचें मन दुखवावें असा • मुळींच नाहीं. परंतु, जे अत्याचारी लोक तुमच्या देशावर आपत्ती आणून माझ्या राज्यासही संसर्ग लावू पहात आहेत, त्यांचें संबंधानें नेहमीं सावध असणें मला भागच आहे. या संबंधांत इतर कोणापेक्षांही माझें ज्ञान विशेष