पान:अकबर १९०८.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
७३

 अब्दुल कादिरची आणि याची गांठ पडती तर फिरून एक नवीनच भानगड उपस्थित झाली असती ! असो. गुरु कुल्लुक दिवाणखान्याच्या एका कोप- यांत बसून समीप असलेल्या उपवनाची शोभा अवलोकन करीत होता आणि उपवनाकडुन येणारा शीतल सुगंधीत मंद समीर त्याचे चित्तास संतुष्ट करीत होता. चोपदाराच्या ललकारण्यानें बादशहा सलामत याचे आग- मनाची वर्दी लागतांच तो उठून उभा राहिला आणि बादशहाचें दिवाणखा- न्यांत पाऊल पडतांच चट्कन् पुढें होऊन त्यानें त्यास आशीर्वाद दिला. कुल्लुकगुरूस पाहतांच अकबराने सन्मानयुक्त स्मितहास्यानें त्यास म्हटलें, आपणाला पाहून मला अत्यंत संतोषानंद वाटत आहे. मला दृढतर आशा आहे कीं, आपण काश्मीराकडील कांहीं आनंददायक वृत्तांत सांगाल. "
 कुल्लुक - प्रभो मी आपणाला काय निवेदन करूं ! तेव्हांपासून मी तो वृत्तांत गुप्ततच राखिला आहे. परंतु, ज्याअर्थी श्रीमंताचा मजवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्याअर्थी स्वदेशहिताविषयीं माझें अंतःकरण तिळतिळ तुटत आहे, त्याअर्थी श्रीमंतापुढें मात्र त्याचे गोपन करणें उचित वाटत नाहीं. बादशहा – मी समजलों. तीच पहिली भानगड पुनश्च उपस्थित झाली. होय ना ? आपसांतील द्वेष आणि फाटाफूट ! पितापुत्रांची भांडणें ! आणि बंधूबंधूचे कलह पुन्हां उपस्थित झाले असतील !
 कुल्लुक— श्रीमंताचा तर्क खरा आहे. आपल्या बंधूच्या हातीं समग्र राज्याधिकार देऊन महाराज नंदीगुप्त काश्मीर सोडून गेल्यावर तरी राज्यांत शांतता राहील असे आम्हांला वाटत होतें. परंतु, तें वाटणें अगढ़ निष्फळ झालें. तशी कांहीं काळपर्यंत राज्यांत शांतता राहून प्रजा संतुष्ट होती. तथापि, पुढें थोडक्याच काळांत तें मन्वंतर बदललें. द्रोही मंडळींनीं चहूंकडे असंतोष पसरविण्यास सुरवात केली आणि आतां पुन्हां कांहींतरी उत्पात होऊ पहात आहे. सगळ्यांत कठीण अशी गोष्ट ही आहे की, त्या सर्व उपयापाचें आदिसळ कोठें आहे याचा कांहींच पत्ता लागत नाहीं. महाराजांचे चिरंजीव जे सांप्रत त्यांच्या विरुद्ध डोकें वर करूं पहात आहेत, ते केवळ रवेच्छेनुसार आहे असें नाहीं; तर या कामांत त्यांना