पान:अकबर १९०८.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
खंड ४ थे.

 बादशहा - परंतु, हैं खचित् समजा कीं, तसें जरी असले तरी त्याला सेलिमाची धर्मश्रद्धा कारण असणें मुळींच संभवनीय नाहीं. तो कुराण आणि रसूलिला यांपेक्षां माशुक आणि मय यांवर अधिक लुब्ध झालेला आहे. कसेही असो. आपण मला ही गोष्ट अगोदर विदित केली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहें. ही गोष्ट जर आरंभीच आपण काढतां तर पुत्रढावेळपर्यंत जें निष्फल भाषण झालें तें झालें नसतें. आपण पुढेही जर मला अशा गोष्टींची वर्दी  देत जाल तर मी आपला अधिकच आभारी होईन. आपल्या सूचनेनें मला हुषार राहून असल्या लोकांवर सक्त नजर ठेवितां येईल.
 अब्दुलकादिर- र-तर मग आतां सेवकाला जाण्याची परवानगी मिळावी. सेवक नेहमीं हुजूरच्या हुकुमाची आठवण ठेवील.
 बादशहानें हंसून झटलें, फार चांगलें, यावें. 'बादशहाची परवानगी घेऊन अब्दुल कादिर निघून गेल्यावर बादशहा आपल्या मनाशीं ह्मणाला, याच्या मनावर माझ्या भाषणाचा कसा काय परिणाम घडतो पहावें.
 तिकडे मार्गांत जातां जातां अब्दुलकादिर आपल्या मनाशींच विचार करीत चालला होता. तो म्हणाला, मीं सेलिमचें नांव घेतलें हें बरें झालें. माझ्या मनांत याला धाक घालून आपल्याकडे वळवून घेण्याचें होतें. परंतु, त्यांना गोष्ट तर कळून चुकली आणि माझा मतलब जशाचा तसाच राहिला. आतां ते मात्र आम्हांवर आणि आपल्या पुत्रावर सक्त नजर ठेवू लागतील. आतां त्यांना आम्हांपैकीं कांहीं लोक त्यांच्या चिरंजिवाना मिळाले आहेत असा संशय आला असेल. अब्दुल- कादिर ! तुला लोक अक्कलवान् म्हणतातना ? आणि तूं हें काय मूर्खपणाचें काम केलेंस ? आफ्सोस ! तुझ्या अंगीं जशी हिंमत वास्तव्य करीत आहे, तशीच जर बादशहा सलामत यांच्याप्रमाणे अंतःकरणाची गंभीरता वास्तव्य करीत असती तर तं काय न करतास !,
 वर वर्णन केल्याप्रमाणें विचार करीत करीत अब्दुलकादिर आपल्या घरी गेला. आणि बादशहा सलामत रमत रमत आपल्या दिवाणखान्यांत आला. त्या ठिकाणी एक पुरुष त्याची मार्गप्रतीक्षा करीत बसला होता. हा पुरुष ह्मणजे आमच्या वाचकांचा दृढपरिचित गुरु कुल्लुक होय. जर कदाचित्