पान:अकबर १९०८.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
७१

 दम मुसलमानीच धर्म तेवढा खरा आणि इतर सर्व धर्म खोटे असें विधान होणें कसें संभवेल ?
 अब्दुलकादिर -- परंतु, अल्लातालानें तर हुजूरच्या धर्मनिष्ठेनेंच इस्लामी धर्माची योग्यता वाढविली आहे.
 बादशहा -- आपलें झणणें रास्त आहे. तथापि तेणेंकरून धर्मनिर्णय होतोच असें नाहीं. प्रत्येक मनुष्याचें हें कर्तव्यच आहे कीं, त्यानें अंध- दृष्टीने आपल्याच धर्मबाबाला न कवटाळून धरितां खऱ्या ईशतत्त्वांचा शोध करावा. सांप्रत माझ्या धर्ममतांचा आणि भक्तिभावाचा राज्यां- तील लोकांशीं कांहींएक संबंध नाहीं. मी या अवाढव्य मोंगल पादशाहीचा मालक असून मला सर्व समान असलेल्या अनेक जातींच्या लोकांशीं मीं दोन तऱ्हेचें वर्तन कसें करावें हें तुह्मीच सांगा. जेथपर्यंत तुम्ही उभय पक्षांच्या धर्मतत्त्वांकडे विचारपूर्वक लक्ष देत नाहीं तेथपर्यंत तुम्हांला या माझ्या प्रश्नाचें नीट रीतीनें उत्तर देता यावयाचें नाहीं. अब्दुलकादिर - तर मग हुजूरची पादशाहत आणि तक्त यांवर जे भय उभे राहण्याचा संभव आहे त्याचें काय करावें ?
   बादशहानें हंसून उत्तर दिलें, आपण म्हणतां यांशिवाय मला कित्येक तरी महत्वाच्या आणि फायदेशीर गोष्टींचा विचार कर्तव्य आहे.' अब्दुलकादिर — त्या कोणत्या ? हुजूराला कोणा परराष्ट्राकडून भय प्राप्त झालें आहे कीं, काय ? कदाचित् त्यांना येथल्याच लोकांकडून गुप्त मदत मिळाली असेल. विशेषत: त्यावेळीं हें भय हुजूरचे खासगी नौकर आणि मुसलमान यांना तर फारच बाधक होईल. हुजूरचे प्रियपुत्र
 बादशहा – सैलिम ? हां ही गोष्ट कांहीं अशक्य नाहीं. खुद्द मी या 'घरगुती बेबनावांचा फायदा घेऊन कित्येक राजघराण्यावर फत्ते मिळ- विली आहे ! आपलें म्हणणें हेंच कीं नाहीं, कीं, खुद्द शहाजादा सेलिमच माझ्या विरुद्ध त्या बंडखोर लोकांना मिळण्यास तयार झाला आहे ?
 अब्दुल कौंदिर - जी हुजूर, तें त्यांना जाऊन मिळालेंच असें माझें णणें नाहीं. परंतु, न जाणो धर्मवेडाच्या भरांत ते अशी गोष्ट करून बसतील अशी मला भीति वाटत आहे.