पान:अकबर १९०८.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७०

खंड ४ थे.

 आणि शहांचा शहा म्हणविला जातो, त्यानें सर्व प्राणिमात्रांकडून धर्मा- चरण करविलें पाहिजे. तें आपणांकडून कोठें घडतें आहे ?
बादशहा -- झालें, तुमची पुराणी कर्मकथा पुढें यावयाची ती आलीच. तुम्हां लोकांना वाटतें कीं, खरीं धर्मतत्त्वें काय तीं तुम्हांलाच कळलीं असून बाकी सर्व लोकांनीं तुमचं ह्मणणें मंजूर केलें पाहिजे आणि असें जो न करील तो काफर ह्मणजे अधर्मी- परंतु, हीं सत्यधर्मतत्त्वं फक्त आपणां- लाच तेवढीं लाभावींत आणि दुसऱ्यांना त्यांतलें कांहींच लाभलें नाहीं. असें तुझीं मानावें तें काय ह्मणून !
 अब्दुल कादिर - याचें कारण असें आहे कीं, खुद्द हजरत रसूलिला पैंगबर याने फक्त आम्हांवरच मेहरबानी करून आम्हांलाच तीं खरीं धर्मतत्त्व अर्पण केलीं आहेत आणि ज्या अर्थी-
 बादशहा – आणि तुम्हांशिवाय असे दुसरे कोणी लोक झालेच नाहींत. कां बरें ? तुझीं जरा फिरंग्यांच्या मुलखांतून आलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडे नजर टाका आणि पहा कीं, ते लोकही तुह्मांप्रमाणेच करामती, भले आणि इमानी आहेत. त्या लोकांतही एक रसूल ( प्रेषि- तदूत) असून त्याची ते खुदातालाप्रमाणेंच भक्ति करितात व त्यांस परमपूज्य मानितात. मला त्यांच्या धर्माची जरी पुरतीशी माहिती नाहीं. तरी मला एवढे खास ठाऊक आहे कीं, तो तुमच्या मुसलमानी धर्माहून पुष्कळच जुना आहे. पुन्हां तिकडे यहुदी लोकांकडे लक्ष द्या, ते तर दुसऱ्या कोणासही मान न देतां हजरत मूसा यालाच मान देतात.. याहि- पेक्षां ब्राम्हण लोकांच्या संबंधानें आपलें काय ह्मणणें आहे ? त्यांचीं धर्मपुस्तकें इतकीं कदीमी ( सनातन ) आहेत. कीं, त्याची अटकळ करणें कठीण आहे. त्या धर्मपुस्तकांश हजरत मूसाचा तौरीद ( जुना करार ) इसाई यांचें इंजील आणि तुम्हां मुसलमानांचें कुराण शरीफ ताडून पाहतां तीं अगदी अलीकडे स्थापिलेली दिसतात. आतां मी आप- ल्यालाच विचारतों कीं, ज्या मीं इतकें ज्ञान संपादन केलें असूनही, वास्तविक पहातां मला त्यांच्या धर्ममतांचा एकशतांशही कळला नाहीं. त्या मला अमुकच एक धर्म खरा आणि अमुक खोटा याचा फैसल्ला कसा करितां येईल ? या गोष्टीचें तुह्मींच विचारपूर्वक उत्तर द्या. मजकडून एक-