पान:अकबर १९०८.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

६९.

 तमाम हुद्दे अबुल फजल सारख्या बेपर्वा आणि फैजीसारख्या काफर लोकांच्या हातीं देऊन ठेविलें आहेत. शिवाय या गोष्टीचीहि हुजूरला पुरेशी माहिती नाहीं कीं, खुदावंतांच्या राज्यास आणि दरबारांत: कांहीं थोड्या लोकांनीं कट करून हुजुरच्या वैभवाची किंमत: कमी करण्याची शपथ खाल्लीं आहे. याचें कारण हुजुरांनी त्यांच्या हक्काच्या नेमणुका त्यांना मिळण्याविषयीं कांहींच मेहेरनजर केली नाहीं.. आतां नुकताच मजला या गोष्टीची प्रचीति पाहण्याचा प्रसंग मिळाला.. मी सहजगत्या एकेजागीं मुल्लांच्या मजालसीस गेलों होतों. त्या ठिकाणी जें कांहीं मीं ऐकिलें तेणेंकरून माझें काळीज अगदीं चरकून गेलें. या खुदा ! ज्या मजालसींत असे वैभवशाली पंडित जमा होतात, ती बादश- हांच्या विरुद्ध काय करूं शकणार नाहीं ? आणि त्यांतही त्यांना जर आपल्या राज्यांतील नाखुष झालेल्या बंडखोर सरदारांची मदत मिळाली, तर मग कांहीं बोलावयासच नको. आमच्या बादशाही दरबारांत आणि तमाम हिंदुस्थानांतही बंडखोर लोकांची उणीव नाहींच !
 अकबरानें विचारिलें, 'आपले मुल्ला आणि त्यांचे अनुयायी यांची काय इच्छा आहे ? त्यांना पूर्ण स्वातंत्र्य नाहीं काय ? आह्मांकडून तर त्यांना सर्व तऱ्हेची पूर्ण मोकळीक आहे व त्यांनीं खुशाल आपल्या मर्जीप्रमाणे लोकांना इस्लामी धर्माचा उपदेश करून आपखुपीनें होतील तितके लोक मुसलमान बनवावेत. आह्नीं कोणत्याही रीतीनें त्यांच्या मार्गात आड येत नाहीं. '
 अब्दुल कादिर -- कधींहि नाहीं. हुजुरचें झणणे बरोबर आहे. पण मी ह्मणतों या धर्मसंबंधांत हुजूरनी इतकी उदासीनता कां दाखवावी ? मुल्ला- लोकांच्या यत्नानें हुजूरकरितांही स्वर्गाचीं कपाटें खुली राहणार नाहींत काय ? हुजूर ह्मणतात मुल्ला लोकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे; परंतु, जें स्वा- तंत्र्य देशीविदेशी आणि धर्मीअधर्मी लोकांना सारखेंच दिलें जातें तें आह्मां खऱ्या धार्मिक लोकांच्या काय कामाचें ? पहा, येथें आपल्या दरबारांतील, फौजेंतील आणि राज्यांतील प्रत्येक मोठमोठा हुद्दा या काफर लोकांच्या हातीं गेल्यानें आम्हां खऱ्या धार्मिक मुसलमानांचें मन दुखविलें जात आहे. हुज़रनींच सांगावें कीं, जो परमेश्वराचा प्रतिनिधी