पान:अकबर १९०८.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८

खंड ४ थे.

 अज्ञात पुरुष म्हणला, 'बहुत अच्छा, आपण ठीक बोललांत. ' कुमार सिद्ध- राम त्या अज्ञात पुरुषाला मुजरा करून चालता झाला. तो गेल्यावर अज्ञात पुरुषानें अब्दुल कादिरास उद्देशून ह्यटलें, ' कसें काय अब्दुलकादिरसा- हेब, ठीक आहेना, आपण विनाकारण आपल्या जिवास इतका त्रास कशाकरितां करून घेतलात ? '

अब्दुल कादिर म्हणाला खुदावंत, ( वाचकांनी जाणिलेंच असेल कीं, तो अज्ञात पुरुष खुद्द बादशहा सलामत शाहनशहा अकबरच होता. ) ज्याअर्थी हुजुरची पूर्ण कृपा या ताबेदारावर आहे त्याअर्थी त्याला विनाकारण त्रास होण्याचें कांहींच कारण नाहीं. असो, सांप्रत बंदा कांहीं अत्यंत जरूरीच्या कामाकरितां हुजुरच्या पायापाशीं आहे. मित्रत्वाच्या आणि प्रजेच्या नात्यानेंही तें माझें कर्तव्यच आहे.

बादशहा -- मला ठाऊक आहे कीं, खास आपणाला माझी कधीही गरज लागत नाहीं; तसें असतें तर कांहीं हरकत नाहीं; मीं आपल्या इच्छेप्रमाणे आपणाला खुष करून निश्चिंत बनविलें असतें. मला वाटतें आपण कांहीं धर्मसंबंधी बाबींवर बोलूं चाहतां आहां. कांहीं चिंता नाहीं, बोला; परंतु, मेहेरबानी करून कांहीं भलतेंच बोलूं नका.

अब्दुल कादिर -- हुजूरचें ह्मणणें रास्त आहे. केवळ धर्मसंबंधी कर्तव्यकर्म बजावण्याकरितांच हुजूरच्या पायापाशीं आला आहे. हुजूरनीं क्षणभर स्वस्थचित्ताने माझ्या विनंतीचा विचार करावा.

बादशहानें सरळ भावानें झटलें, “ तुझांला जें काय बोलावयाचें असेल तें खुशाल बोला. मी तें लक्षपूर्वक ऐकेन. शर्त एवढीच की आपण मात्र मर्यादे बाहेर पाऊल टाकू नये. "

 अब्दुलकादिर - हें तर हुजूरवर अवलंबून आहे. मी आपल्याकडून होईल तेथपर्यंत काकुळतीनेंच विनंति करीन. मजकडून जाणूनबुजून मर्यादेबाहेर पाऊल पडणार नाहीं. ज्या ज्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत त्या त्या हुजूरला विदित करणें हें हुजूरची भलाई चालणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. खुद्द हुजुरांसही पूर्णपणे ठाऊक आहे कीं, आह्मां धर्मनिष्ट मुसलमानांत कित्येक दिवसांपासून एकप्रकारची नाराजी चालत आली आहे आणि त्या नाराजीचें कारण हुजूरनी बादशाहींतील