पान:अकबर १९०८.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
६७

 त्याच्यानें पुढें एक शब्दही बोलवेना. अब्दुलकाद्विराचें भाषण बंद झालें एवढ्यानें बरें झालें. कां कीं, जर तसाच पुढें बोलत जातां तर कदा- चित् कुमार सिद्धरामाचा क्रोधही अनावर होऊन त्याचा परिणाम भयं-- कर झाला असता. कांहीं वेळ जाऊन पहिला रागाचा झटका कमी झाल्या- वर अब्दुल कादिर पुन्हां म्हणाला आम्हां खन्या धार्मिक लोकांना एवढेच पुरें आहे कीं, तुझी लोक अधर्मी आहांत ! परंतु, तुझी काय कोणाची पर्वा करणार आहांत ? मी जरी इतका तुमच्या विरुद्ध आहे, तरी मी तुमचें कांहींच करूं शकत नाहीं. मी केवळ एक क्षुल्लक मनुष्य. आहे. बादशहा सलामत यांचें आपणाला मेहेरबानीचें वचन मिळालेच आहे.. त्यांच्या मनास जसें येतें तसेंच तें करूं शकतात आणि करतातही. तुह्मी लोक विधर्मी ह्मणून जे कर आणि जे महसूल पूर्वी तुह्मांवर लागू केले. होते ते सर्व त्यांनीं तुह्मांस माफ करून टाकिले. ते तुझां लोकांना बोल-- बोलवून तमाम हुद्दे आणि फौजेंतील मोठमोठ्या जागा तुमच्या स्वाधीन: करीत आहेत आणि तुमच्याच लोकांतून ते हमेशा सल्लागार आणि मित्र: पसंत करीत असतात. यापेक्षां आपण आणखी काय चाहतां ? चला सौडा,. आह्नांला जाऊं द्या; आह्मी आपलें कांहींएक नुकसान करूं शकत नाहीं.. परंतु, कधीं तरी एके दिवशीं तुह्मां लोकांवर खुदाचा कोप गुजरेल आणि आश्चर्याची गोष्ट नाहीं कीं, ज्यानें तुम्हां लोकांना तरवारीनें शिक्षा देण्याचें ऐवजीं तुमच्यावर मेहेरबानी करून तुम्हांला पोटाशी धरलें आहे,. त्या बादशहा सलामतवरही परमेश्वराचा अघटित कोष उतरेल. वास्तविक पहातां खुदानें त्याला तुम्हां आम्हां विधर्मी लोकांना सक्त सजा देण्या-- करितांच तक्तनशीन बनविलें आहे..
 अब्दुल कादिरच्या या भाषणानंतर अज्ञात पुरुषानें मृदुस्वरानें म्हटलें, 'परंतु मला असें वाटतें कीं, अशाप्रकारच्या भाषणापासून कांहीं लाभ न होतां उलट वितुष्ट मात्र वाढतें. सिद्धरामजी, निःसंदेह या भाषणाच्या प्रत्युत्तरादाखल तुम्हांला पुष्कळसें बोलावयाचें असेल आणि खुद्द मी देखील यांच्याशी सहमत नाहीं.. सिद्धराम - आपलें ह्मणणें यथार्थ आहे. मीही रिकामा वाद वाढवू इच्छित नाहीं. यावेळी विलंब होत आहे; सबब, पुन्हां कधी प्रसंग आल्यासा मी यांना उत्तर देईन...