पान:अकबर १९०८.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
खंड ४ थे.

 मात्राचें सुखावलोकन होतांच हा नेहमीं असाच बिथरून जात असतो. कारण, याचा असा समज आहे कीं, एकाया हिंदूचें नुसतें मुखावलोकन झाल्याने आपला धर्म भ्रष्ट होऊन आपणांस बाट लागतो. ( अब्दुलकादि- रकडे पाहून ) कां दोस्त, मी हाटलें हें बरोबर आहे ना ? "
>  अब्दुलकादिर ह्मणाला, "हुजूरचें ह्मणणे खरें आहे. " कुमाराकडे पाहून "" खरेंच पुसाल तर खास तुमच्याशीं माझें कांहीं वैर नाहीं. परंतु, तुमच्या जातीशीं आहे. होईल तितकें करून तुह्मां काफर लोकांची पाळेंमुळें खणून टाकून तुमचें निसंतान करण्याचें मीं ब्रीद बांधिलें आहे. बस्स, हमेशा याच खटपटीत मी असतो आणि तुमच्या जातीचा नेहमीं तिरस्कार करितों. असें जरी आहे तरी तुमच्याठिकाणी माणुसकी आहे आणि तुमच्या जातीं- ती कांहीं थोड लोक असे आहेत कीं, त्यांना मी मान देतों. परंतु, -मोठी खेदाची गोष्ट ही आहे कीं, तुझी लोक आमच्या धर्माची निंदा करितां ती करितां आणि बादशहा सलामत यांनाही धर्मबाह्य आचरण करा- वयास लावितां तुह्मी अाताला आणि रसूलिला यास न मानणारे असून हमेशा आला धर्मभोळ्या लोकांना काढून टाकून राज्यांतील सर्व मोठे मोठे हुद्दे आणि श्रेष्ठ पदव्या आपणच बळकावून बसण्याची खटपट करीत असतां ज्याच्या वांचून खरोखरच दुसरा देव असणें संभवनीय नाहीं, त्या आमच्या खुदाच्या ऐवजी तुझीं आपली खोटीं धर्मतत्वें आणि • नाशवंत मूर्ति यांनाच कायम करितां आणि आम्हांसारख्या त्याच्या खऱ्या खऱ्या धर्मनिष्ट लोकांच्या अध्यात्मज्ञानाची पायमल्ली करितां. याच- करितां आणि फक्त याच सबबीवर मी तुमचा आणि तुमच्या जातीचा अत्यंत तिटकारा करीत असतो आणि माझ्या जिवांतजीव आहे तेथपर्यंत मी तुमच्या विरुद्धच खटपट करीत राहणार. तुझी लोक अधर्मी, पाखंडी आणि मूर्तिपूजक असून हरप्रयत्नानें लोकांची दिशाभूल करून त्यांना भलत्या मार्गाला लावीत असतां आणि आमचे बादशहा सलामत यांचे चित्तही गढूळ करून टाकीत असतां. बस्स, पुरें झालें; तुझी लोक काफर, अधर्मी, पाखंडी - "
 अशा प्रकारचें भाषण करीत असतां अब्दुलकादिरचा चेहरा रागानें लाल होऊन गेला आणि त्या आवेशाचे भरांत गळा दाटून आल्यामुळे