पान:अकबर १९०८.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६५

अकबर.

 त्यांस पहातांच त्या अज्ञातपुरुषानें मंदस्वरानें टेलें, “अब्दुल कादिर* येत आहेत वाटतें ? "
 अब्दुलकादिर आल्यावर अज्ञात पुरुषानें, त्याचा सलाम घेऊन त्यास कुशल प्रश्न विचारीत असतां, आपलें नांव उघड न करण्याविषयीं त्यास सुच- विलें. पुढें अब्दुल कादिरानें अत्यंत अहंकार दृष्टीनें सिद्धरामास नखशिखांत अवलोकन केल्यावर, त्याच्याशीं एक शब्दही न बोलतां तो त्याजकडे पाठ करून उभा राहिला. हें त्याचें अपमानकारक वर्तन पाहून कुमार सिद्धरामाचें रक्त खवळून जाऊन क्रोधानें त्याला दरडावून अशा बेह- ज्जती आचरणाचें कारण विचारण्याच्या तो बेतांतच होता. इतक्यांत अज्ञात पुरुषानें त्याला प्रतिबंध करून झटलें, “ जाऊं या सिद्धरामजी, आपण माझ्या या मित्राच्या वर्तनाबद्दल राग मानूं नका. मला पूर्णपणें ठाऊक आहे कीं, हें त्याचें वर्तन केवळ आपणाशींच आहे असें नाहीं; तर हिंदु-
 * मुल्ला अब्दुलकादिर अल्बदौनी याचें जन्म बदाऊन येथें इसवी सन १५४० त झालें होतें. तो गानविद्या, ज्योतिष आणि इतिहास यांमध्यें अत्यंत प्रवीण होता. आणि त्याचा आवाज मोठा असल्यामुळें तो 'दरबारी इमाम ' नेमला गेला होता. तो लहान वयाचा असतांच त्याचा अकबरच्या दरबारीं प्रवेश झाला. आणि अकबरानें त्याजकडून अरबी आणि संस्कृत ग्रंथांचें फारशीत भाषांतर करविलें. हा अगदीं कट्टा मुसलमान होता. तो जरी अबुलफजलच्या हाताखाली काम करीत होता, तरी त्यानें त्याला काफीर आणि विधर्मी समजून आपल्या ग्रंथांत अनेक जागीं त्याचें संबंधानें दुर्वचनांचा उपयोग केला आहे. त्यानें एक ' तारिखे - बदौनी' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांत त्यानें ' गझनवी बादशहापासून तो थेट इ. स. १५९० पर्यंतचा इतिहास दिला आहे. त्याच ग्रंथांत अकबराच्या राज्याचा चाळीस वर्षांचा वृत्तांत लिहिला आहे. खुद्द अकबराविषयींही त्यानें अनेक जागीं निंदाप्रचुर शब्दांचा प्रयोग केला आहे. अल्बदौनी यानें रामयण, महाभारताचा कांहीं भाग आणि काश्मीरचा इतिहास यांचे फारशींत भाषांतर केलें आहे. तो इ. स. १६१५ ह्या वर्षी मृत्यु पावला.
>