पान:अकबर १९०८.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

६४
खंड ४ थें.

रात्रंदिवस हीच चिंता असते कीं, सर्वशक्तिमान परमेश्वरानें ज्या प्रजाज- नांना त्यांच्या हातांत सोपविलें आहे त्यांचीं सुखसंपत्ति आणि विद्या यांची उन्नति कशी होईल ! बादशहा सलामत उन्नतीकरितां अनेक यत्न केले व करीत आहेत. कलह तसेच देशभाव आणि विरोध त्यांनीं यांनीं आपल्या प्रजेच्य भिन्न भिन्न जातींचे धर्म- एकप्रकारें नाहींसे केले आहेत आणि स्वार्थसाधु प्रबळ अधिकाऱ्यांच्या अत्याचारास आळा घातला आहे. त्यांनी वंगदेशच्या कारागिरीस विशेष साह्य केलें असून वे सदां सर्वत्र उन्नति करण्याच्या उद्योगांत मग्न असतात. अहोरात्र त्यांना शिल्पविद्या आणि साहित्य यांच्या उन्नतीचाच वेध लागलेला असतो. आणि आपली प्रजा सभ्यतेच्या आणि शिष्टतेच्या उच्च सोपानावर कंशी आरूढ होऊन देशाचे यश वाढवील, याच गोष्टींचा ते विचार करीत असतात. आतां आपणच सांगा कीं, हें एक मनुष्याचें काम आहे काय ? पुन्हां अशाच रीतीनें एकाया दुष्प्राप्य वस्तूच्या प्राप्तस्तव उद्योग केला गेला तर तो निंद्य कसा ह्मणतां येईल ? खरें पुसाल तर बादशहांची मनोभावना कधीं पूर्ण होणारी नाहीं. न जाणो कितीएक वर्षे त्यांनीं याच विचारांत आणि परिश्रमांत घालविलीं. परंतु, त्या मनोभावनेची प्राप्ती किती दूर आहे तें ईश्वरास ठाऊक. "
 कुमार सिद्धराम त्या अज्ञात पुरुषाचें भाषण लक्षपूर्वक ऐकत होता. इतक्यांत तो पुरुष उठून उभा राहिला दोन्ही हात आकाशाकडे करून ईश्वराची प्रार्थना करूं लागला. शेवटीं त्यानें खांलीं बसून मान खालीं झुकविली. आपल्या समोर असलेला अज्ञात पुरुष खुद्द बादशहा सलमत तर नव्हे ? असा सिद्धरामास संशय येऊन तो उठून उभा राहण्याच्या बेतात होता, इतक्यांत पुन्हा त्याला असें वाटलें कीं, कोणी- कडे बादशहा सलामत आणि कोणीकडे हा एक साधारण मनुष्य ! सिद्ध समानें त्या अज्ञात पुरुषाविषयीं कांहीं विशेष माहिती मिळावी ह्मणून त्यास तशा धोरणाचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इतक्यांत एक नखशिखांत श्वेतवर्ण वस्त्र परिधान केलेला ठेंगणासा दाढीवाला मुसलमान समोरून येत असलेला त्यानें पाहिला.