पान:अकबर १९०८.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अकबर..

६३

संतुष्ट आणि प्रसन्न झाला. त्यावेळीं त्यानें सिद्धरामाच्या खांद्यावर हात टाकून सावकाश आणि मधुर अशा स्वरानें झटलें, आपण जें बोल- लांत तें खरें आहे. यद्यपि आपण मला ओळखत नाहीं, तथापि आपला मजवर विश्वास आहे आणि मी आशा करितों कीं, जेव्हां आपण मला चांगल्याप्रकारें ओळखाल तेव्हांही मजवर असाच विश्वास ठेवाल. अस्तु. आपण काय झटलें कीं, 'बादशहाला अत्यंत तृष्णा नाहीं काय ?, कबुल आहे. मी त्यांना ओळखतों आणि ते तृष्णायुक्त आहेत हैं गृहीत धरितों. परंतु, कोणत्या विषयांत ? बादशहा सलामत यांना आपलें अगोदरच विस्तृत असलेलें राज्य अधिकाधिक वाढवि ण्याचीं इच्छा असते अशी आपल्या दिलाची समजूत जाहे काय ? जेवढ़ें त्यांना प्राप्त झालें आहे, तेवढ्यांत ते संतुष्ट नाहीत ? मला ठाऊक आहें कीं, वडिलार्जित राज्यापैकीं दिल्ली आणि आग्रा या व्यतिरिक्त त्यांना कांहींच मिळलेलें नव्हतें. त्यांचें पूज्य पिता जेव्हां परलोकवासी झाले तेव्हां केवळ इतकेंच राज्य त्यांच्या ताब्यांत होतें. परंतु, सांप्रत त्यांची राज्य- धुरा पश्चिमेस फारस देशापासून तो पूर्वेस बंगालच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेस गोवळकोंड्यापर्यंत पसरली आहे. मग आपण असें कसें अनु- मान करितां कीं, त्यांना नवीन देश काबीज करण्याची इच्छा आहे आणि विशेषत: आपला दूरवर्ती देश काश्मीर जो जिंकिल्यापासून केलेले श्रमही सुफल व्हावयाचे नाहींत. तथापि अशी कांहीं कारणें घडतात कीं, ज्याच्या योगानें कोणताही राजा आपल्या समीपवर्ती राज्याची स्वतंत्रता सहन्न करूं शकत नाहीं. अर्थात् जेव्हां त्या समीपवर्ती राजाकडून त्याच्या प्रजेच्या सौख्यानंदांत आणि उन्नतीत अंतराय येतो तेव्हां त्याला निरुपाय होऊन आपल्या इच्छेविरुद्ध म्यानांतून तरवार बाहेर काढणेंच भाग पडतें. मग तो त्या समीपवर्ती राजाच्या प्रजेला जरी स्वतःच्या प्रजेप्रमाणें मानीत असला तरी देखील त्याला युद्धावांचून गत्यं- तर रहात नाहीं. अशाच प्रकारच्या अनेक कारणांनी आमचे तैसूर कुलो- त्पन्न बादशहा आपली राज्यतृष्णा आवरूं शकत नाहींत. जेव्हांपासून त्यांना कळूं लागलें तेव्हांपासून त्यांची हीच तृष्णा अर्थात् लालसा आहे. कीं, एक मोठें थोरलें प्रचंड राज्य स्थापित व्हावें आणि सर्वपरी त्यांना